शिक्षण मंत्रालय

आयआयटी मुंबईच्या 56व्या पदवीदान समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती

ऊर्जा, विज्ञान आणि अभियांत्रिकी तसेच पर्यावरण विज्ञान आणि अभियांत्रिकी केंद्राच्या नवीन इमारतीच्या पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

Posted On: 11 AUG 2018 4:07PM by PIB Mumbai

 

मुंबई, 11 ऑगस्ट 2018

 

 

भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबईच्या 56व्या पदवीदान समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पंतप्रधान म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान संस्थांच्या विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगतीची एकेक वीट उभी केली तसेच प्रत्येक क्लिकद्वारे प्रगतीचा आलेख उंचावला. ते पुढे म्हणाले की, भारत सातत्याने नाविन्यकरणाचा निर्देशांक उंचावत असून भारतातील तंत्रज्ञान संस्था या परिवर्तनात्मकतेच्या आधारशीला आहेत. भारतीय तंत्रज्ञान संस्था या जागतिक पातळीवरील भविष्याच्या तंत्रज्ञानाचा आरसा असून भारत स्टार्ट अपमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

 आपण स्वतंत्र्य भारतात राहतो हे आपले सौभाग्य आहे. कालच्या स्टार्ट अपच्या सहकार्याने आजचा भारत घडवायचा असून त्यांनी भारताच्या शैक्षणिक वातावरणाचा आढावा घेतला. स्टार्ट अप उपक्रमांतून उद्यमशील व्यावसायिकांची निर्मिती होऊन त्याचा हातभार भारताच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला लाभतो. संशोधन आणि नाविन्याच्या माध्यमातून विविध उपक्रमांची पायाभरणी केली जाऊन आज मला भविष्यातील स्टार्ट अप भारताचे चित्र स्पष्ट दिसत आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की स्टार्ट अपमुळे देशाच्या अनेक समस्या सोडविण्यास मदत होईल तसेच यामुळे कल्पना आणि परिश्रमावर आधारित निकाल आपल्याला बघता येतील.

यावर्षीच्या पदवीधर विद्यार्थ्यांमध्ये 308 पीएचडी, 54 दुहेरी पदव्या (एम.टेक/एमफिल+पीएचडी) आणि 32 दुहेरी पदव्या (एमएससी+पीएचडी) यांचा समावेश आहे. यापैकी 36 संशोधकांची पीएचडी थिसीसमधील सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्‍याचबरोबर मोनाश विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने 29 संयुक्त डॉक्टरेट पदव्या मोनाश विद्यापीठाचे कुलगुरू आणि अध्यक्ष प्रा. मार्गारेट गार्डनर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्या.

याशिवाय 7 एमएससी (संशोधन), 6 दुहेरी पदव्या (एमएससी+एमटेक), 2 दुहेरी पदव्या (एमएससी+एमफिल), 615 एमटेक, 63 एमडीएस, 27 एमफिल, 106 एमएमजीटी, 246 दोन वर्षांचा एमएससी, 25 पाच वर्षांचा एकात्मिक एमएससी, 400 दुहेरी पदव्या (बीटेक+एमटेक), 611 बीटेक पदव्या, 14 बीएस आणि 14 पीजीडीआयआयटी पदव्या यावेळी प्रदान करण्यात आल्या.

सिंफनी टेक्नॉलॉजी समुहाचे संस्थापक, अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी डॉ. रोमेश टी. वाघवानी यांना यावेळी डॉक्टर ऑफ सायन्सेस बहाल करण्यात आली. यावेळी बोलताना वाधवानी यांनी त्यांनी शिकलेले तीन धडे सांगितले. नेहमी लवचिक आणि धीट रहावे तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे उदार असावे असे ते म्हणाले.

आयआयटी मुंबईच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष दिलीप शांघवी यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.  विद्यार्थ्यांना असे शिक्षण येथे देण्यात आले आहे ज्याद्वारे केवळ त्यांच्याच नव्हे तर इतरांच्या आयुष्यातही परिवर्तन घडविण्याची शक्यता आहे याची आठवण त्यांनी करून दिली. अपयशाला न घाबरता धैर्याने आपली आवड जोपासा, स्वप्नांचा पाठलाग करा आणि आपल्या कुटुंबाला आणि देशाला धैर्याने आपली आवड जोपासा, स्वप्नांचा पाठलाग करा आणि आपल्या कुटुंबाला आणि देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करा, असे आवाहन त्यांनी केले.

आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. डी.व्ही.खाकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले आणि गेल्या 60 वर्षातील महत्त्वपूर्ण बदलांचा आढावा घेतला. पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधन, व्यवस्थापन आणि संरचना शिक्षणाचा समावेश, ग्रामीण तंत्रज्ञानावरील कार्य यावरील वाढता भर हे काही महत्वपूर्ण बदल असल्याचे ते म्हणाले.

हिरक महोत्सवी वर्षात केंद्र सरकारकडून ‘सर्वोत्कृष्ट संस्थेचा’ दर्जा मिळणे ही या संस्थेची कामगिरी कौतुकास्पद असून या निमित्ताने नवीन उपक्रम हाती घेतले जातील असे ते म्हणाले.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(Release ID: 1542797)
Read this release in: English