मंत्रिमंडळ

भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संयुक्त टपाल तिकिटाला मंत्रीमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 09 AUG 2018 7:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संयुक्त टपाल तिकिटाला मंजुरी देण्यात आली. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील धोरणात्मक भागीदाराची 20 वर्षे या संकल्पनेवर हे टपाल तिकीट असून जून 2018 मध्ये ते जारी करण्यात आले.

या स्मृती टपाल तिकिटावर दीनदयाळ उपाध्याय आणि दक्षिण आफ्रिकेचे ऑलिव्हर रेगिनॉर्ड टेम्बो यांचे चित्र आहे. यासंदर्भात, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मे 2018 मध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1542541) आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English