मंत्रिमंडळ
विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यासंबंधित भारत आणि इंडोनेशियातील सामंजस्य कराराला मंत्रीमंडळाची मंजुरी
Posted On:
09 AUG 2018 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यासंबंधित भारत आणि इंडोनेशियातील सामंजस्य कराराला मंजुरी देण्यात आली.
या सामंजस्य करारावर मे 2018 मध्ये नवी दिल्ली इथून विज्ञान, तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी भारतातर्फे तर इंडोनेशियातर्फे जकार्ता येथून तिथले संशोधन तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षण मंत्री मोहम्मद नासीर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात परस्पर हिताला चालना मिळणार आहे.
हितसंबंधितांमध्ये भारत आणि इंडोनेशियातल्या संस्थांमधले शास्त्रज्ञ, शिक्षक, संशोधन आणि विकास प्रयोगशाळा व कंपन्या यांचा समावेश आहे. तात्काळ सहकार्यासाठीच्या संभाव्य क्षेत्रांमध्ये माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, सागरी विज्ञान व तंत्रज्ञान, जीवन विज्ञान, ऊर्जा संशोधन, जल तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, अंतराळ विज्ञान, तंत्रज्ञान आणि उपयोजनं, उपयोजित रसायनशास्त्र यांचा समावेश आहे.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar
(Release ID: 1542371)
Visitor Counter : 196