मंत्रिमंडळ
एनडीआरएफच्या चार अतिरिक्त तुकड्यांसाठी मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
09 AUG 2018 5:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 ऑगस्ट 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत, केंद्रीय मंत्रीमंडळाने एनडीआरएफच्या चार अतिरिक्त तुकड्यांसाठी मंजुरी दिली. आपत्ती प्रतिसाद क्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून यासाठी 637 कोटी रुपये अंदाजित खर्च आहे.
सुरुवातीला भारत-तिबेट सरहद्द पोलीस (आयटीबीपी) मधील दोन तुकड्या आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) व आसाम रायफल्समधील प्रत्येकी एक तुकडी म्हणून त्या असतील. त्यानंतर त्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकड्या म्हणून परिवर्तित करण्यात येतील. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र येथे त्या तैनात करण्यात येतील.
सध्या एनडीआरएफच्या 12 तुकड्या असून त्या देशाच्या विविध भागात तैनात आहेत.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar
(Release ID: 1542338)
Visitor Counter : 99