पंतप्रधान कार्यालय

“आयुष्मान भारत” अंतर्गत आरोग्य विमा कार्यक्रमाच्या तयारीचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

Posted On: 04 AUG 2018 2:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य विमा योजनेच्या प्रारंभीच्या तयारीचा आज आढावा घेतला.

प्रति कुटुंब पाच लाख पर्यंत विमा कवच या योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. दहा कोटीपेक्षा जास्त गरीब आणि वंचित कुटुंबांना हे कवच पुरविण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

राज्यांमधील तयारी आणि या योजनेशी संबंधित तंत्रविषयक पायाभूत सुविधांचा विकास यासह विविध पैलूंबाबत, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, नीती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.

एप्रिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून पंतप्रधानांनी, आयुष्मान भारत अंतर्गत छत्तीसगडमधल्या बिजापूर या महत्वाकांक्षी जिल्ह्यात पहिल्या हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटरचे उद्‌घाटन केले होते.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar



(Release ID: 1541702) Visitor Counter : 106


Read this release in: English