वस्त्रोद्योग मंत्रालय

यंत्रमागांच्या अद्यतनासाठी पॉवर टेक्स इंडिया योजनेची अंमलबजावणी सुरु

Posted On: 01 AUG 2018 5:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2018

 

देशात यंत्रमाग क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकार पॉवर टेक्स इंडिया ही योजना राबवित आहे. या योजनेअंतर्गत, देशभरात कार्यरत असणारे यंत्रमाग सेमी ऑटोमॅटिक आणि शटललेस प्रकारात अद्ययावत केले जात आहेत. उत्पादनांचा दर्जा आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने ही योजना राबविली जात आहे. आतापर्यंत अशा प्रकारे देशभरातील 2.16 लाख मागांचे अद्यतन करण्यात आले आहे.

भारत हा देशातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे. 2017-18 या वर्षात जागतिक स्तरावर 26.71 दशलक्ष मेट्रिक टन कापसाचे उत्पादन झाले. त्यापैकी भारतात सर्वात जास्त 6.29 दशलक्ष मेट्रिक टन कापसाचे उत्पादन घेण्यात आले.

वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय तामटा यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

B.Gokhale/M.Pange/P.Malandkar

 



(Release ID: 1541034) Visitor Counter : 104


Read this release in: English