संरक्षण मंत्रालय

जम्मू आणि काश्मीरमधील लष्करी तळांवर दहशतवादी हल्ले

Posted On: 23 JUL 2018 6:22PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 जुलै 2018

 

जम्मू आणि काश्मीरमधील लष्करी तळांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची तपशीलवार चौकशी केली जात असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज राज्यसभेत दिली. 2016 साली अशा प्रकारचे हल्ले पाच वेळा झाले. 2017 साली जम्मू आणि काश्मीरमधल्या एका लष्करी तळावर हल्ला झाला तर 2018 साली आतापर्यंत असे तीन हल्ले झाले आहेत.

जम्मू काश्मीरमधील लष्करी तळांवर होणाऱ्या या दहशतवादी हल्ल्यांची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. असे हल्ले रोखण्यासाठी तसेच प्रतिकाराच्या दृष्टीने अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. जोखमीच्या निकषावर तेथील लष्करी तळांचे वर्गीकरण, दहशतवाद्यांसंदर्भात प्राप्त माहितीचे योग्य विश्लेषण, प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी अत्याधुनिक हत्यारे आणि तंत्रज्ञानाचा वापर अशा अनेक बाबींचा त्यात समावेश आहे.

 

N.Sapre/M.Pange/P.Kor



(Release ID: 1539734) Visitor Counter : 65


Read this release in: English