वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
इनक्युबेशन आणि निधी पुरवठ्यासाठी 550 पेक्षा जास्त स्टार्ट अप्स वर देखरेख
प्रविष्टि तिथि:
23 JUL 2018 3:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जुलै 2018
जून 2018 पर्यंत स्टार्ट अप इंडिया हब ने इनक्युबेशन आणि निधी पुरवठ्यासाठी 550 पेक्षा जास्त स्टार्ट अप्सवर देखरेख ठेवली आहे. या हब मार्फत 2,20,000 नोंदणी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्या आणि एक लाखापेक्षा जास्त विचारणांना उत्तरे देण्यात आली. मे 2018 मध्ये घोषित करण्यात आलेल्या स्टार्ट अप इंडिया कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात वित्तपुरवठ्यासाठी अशा 80 इनक्युबेशन केंद्रांची निवड करण्यात आली.
स्टार्ट अप इंडिया उपक्रमाशी संबंधित सर्व बाबी हाताळण्यासाठी स्टार्ट अप पोर्टल सुरू करण्यात आले तसेच वापरकर्त्यांना सेवा आणि माहिती तात्काळ देण्यासाठी स्टार्टअप इंडिया हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले. 15 जुलै 2018 पर्यंत 11,129 स्टार्ट अप्सना स्वतंत्र ओळख मिळाली तर शिक्षण आणि विकास मोड्यूल अंतर्गत 2,15,000 नोंदण्या पूर्ण झाल्या.
स्टार्ट अप साठी पेटंट नोंदणीची प्रक्रियाही जलद करण्यात आली आहे. स्टार्ट अप्सना पेटंट आणि ट्रेडमार्क सुलभरित्या उपलब्ध करून देण्यासाठी 1029 जणांना नामिकेवर नेमण्यात आले.
वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी. आर. चौधरी यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.
N.Sapre/M.Pange/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1539621)
आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English