अर्थ मंत्रालय

सॅनिटरी नॅपकीन, राखीसह आणखी वस्तू, वस्तू आणि सेवा कर मुक्त

Posted On: 21 JUL 2018 9:00PM by PIB Mumbai

केंद्रीय रेल्वे, वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली वस्तू आणि सेवाकर परिषदेच्या  नवी दिल्लीत झालेल्या 28 व्या बैठकीत वस्तू आणि सेवा कराबाबत हे निर्णय घेण्यात आले

रंग आणि वार्निश, पुट्टी, पाणीदुध थंड ठेवणाऱ्या उपकरणासह फ्रीज, चामडे उद्योगासाठी लागणारी शीतकरण साधने, आईसक्रिम, फ्रीझर,  मशीन , व्हॅक्यूम 

  क्लीनर, मिक्सर, ग्राइंडर सारखी घरगुती विद्युत उपकरणे, 68  सेंटिमीटर 

पर्यंतचा दूरचित्रवाणी संच,अग्नी शमन वाहन यासारखी विशिष्ट हेतू वाहनेट्रेलर्स आणि सेमी ट्रेलर्स,सेंट, स्प्रे,पावडर पफ,या सारख्या किरकोळ वस्तू यावरचा  वस्तू आणि सेवा कर कमी करून तो 28 % वरून 18 %टक्के करणे

फ्युएल सेल वाहनावरचा वस्तू आणि सेवा कर 28% वरून 12%करणे

मार्बल,लाकडाच्या मूर्ती,राखी,( मौल्यवान साहित्यापासून बनवलेली राखी वगळता सॅनिटरी नॅपकीन,टाकसाळीकडून  वित्त मंत्रालयाला विक्री करण्यात येणारी विशेष स्मरणार्थ नाणी यावरचा वस्तू आणि सेवा कर शून्य करण्यात आला आहे.

1000 रुपयापेक्षा कमी किमतीच्या भरतकाम केलेल्या टोप्या,फोस्परिक एसिड(केवळ खत श्रेणीतले)  यावरचा वस्तू आणि सेवा कर 12 % वरून 5 % करण्यात आला आहे.

इंधनात मिसळण्यासाठी तेल कंपन्यांना विक्रीसाठीचे इथेनॉलवरचा वस्तूआणि सेवा कर 18% वरून 5% करण्यात आला आहे. 

1000 रुपयांपर्यंतच्या किरकोळ किमतीच्या पादत्राणाना 5 % वस्तू आणि सेवा कर

1000 रूपयांपेक्षा जास्त किमतीच्या पादत्राणाना मात्र 18 % वस्तू आणि सेवा कर लागू राहील.

हस्तकलेच्या विशिष्ट वस्तूवरचा  ( वस्तू आणि सेवा कर परिषदेने संमत केलेल्या हस्तकलेच्या व्याखेप्रमाणे)वस्तू आणि सेवा कर 18 % वरून 12 % करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये पर्स,पाऊच,दागिन्यांचीपेटी,चित्रासाठीच्या लाकडी  फ्रेम,कलाकुसरीचे आरसे,काचेच्या मूर्ती,तांबेपितळचांदी यांच्या कलात्मक वस्तू,हस्तकलेचा वापर केरात तयार केलेले दिपमेणाच्या वस्तू यांचा समावेश आहे.

हाती बनवलेले गालिचे,हाती बनवलेल्या लेस आणि दागिनेतोरण यांच्यावरचा वस्तू आणि सेवा कर 12 % वरून 5 % करण्यात आला आहे.   

जीवन सत्व युक्त दुधमिनरल साल्ट चे वर्गीकरण दुध म्हणून करण्यात आले असून ते वस्तू आणि सेवा करातून मुक्त करण्यात आले आहे.

सार्वजनिक कारणासाठी  पुरवण्यात येणारे पाणी ( बाटलीबंद वगळता )  त्यावर वस्तू आणि सेवाकर  लागू नाही.

NS/NC 



(Release ID: 1539599) Visitor Counter : 113


Read this release in: English , Bengali