पंतप्रधान कार्यालय

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन

Posted On: 18 JUL 2018 2:53PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 18 जुलै 2018

 

पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णय होणे आवश्यक आहे. देशातल्या अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे आणि जेवढी व्यापक चर्चा होईल, सर्व वरिष्ठ अनुभवी लोकांचे मार्गदर्शन सभागृहाला मिळेल, तेवढा देशालाही फायदा होईल, सरकारला देखील आपल्या निर्णय प्रक्रियेत चांगल्या सुचनांमुळे लाभ होईल. सर्व राजकीय पक्ष सभागृहाच्या वेळेचा उपयोग देशातली महत्त्वपूर्ण कामे पुढे नेण्यासाठी करतील अशी मी आशा करतो. प्रत्येकाचे पूर्ण सहकार्य लाभेल आणि देशभरात भारताच्या संसदेच्या कामकाजाचे चित्र राज्य विधानसभांसाठीही प्रेरणादायी ठरेल असे उत्तम उदाहरण संसदेतील सर्व खासदार आणि सर्व राजकीय पक्ष सादर करतील अशी मला आशा आहे. दरवेळी मी माझी आशा व्यक्त केली आहे, प्रयत्नही केले आहेत. यावेळीही आशा व्यक्त करतो. यावेळीही प्रयत्न करत आहोत आणि आमचे प्रयत्न कायम सुरू राहतील. कोणताही पक्ष, कोणत्याही सदस्याला कोणत्याही विषयावर चर्चा करायची असेल तर सरकार चर्चेसाठी तयार आहे. हे पावसाळी अधिवेशन आहे, देशातील अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे तर काही भाग असा आहे जिथे अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मला वाटते अशा विषयांवरील चर्चा खूप उपयुक्त ठरतील.

खूप खूप धन्यवाद.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor



(Release ID: 1538959) Visitor Counter : 108


Read this release in: English