पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या हस्ते  मिर्झापूर येथील  बनसागर  कालवा  प्रकल्प  राष्ट्राला अर्पण

प्रविष्टि तिथि: 15 JUL 2018 6:44PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 15 जुलै 2018

 

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी आज मिर्जापूर येथील बनसागर कालवा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. या प्रकल्पामुळे या क्षेत्रातील सिंचन क्षमता वाढणार  असून उत्तर प्रदेशातील मिर्जापूर आणि अलाहाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे फायदा होणार आहे.

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिर्झापूर मेडिकल कॉलेजचा  पाया भरणी समारंभ संपन्न झाला.  त्यांनी राज्यातील 100 जन औषधी केंद्राचे उद्घाटन केले. त्यांनी बलूघाट, चुनार येथील  गंगा नदीवरील  एक पूल देखील राष्ट्राला अर्पण केला जो मिर्झापूर व वाराणसी या शहरांना  जोडला जाईल.

या प्रसंगी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, मिर्झापूरमध्ये प्रचंड क्षमता आहे. सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी त्यांनी फ्रेंच अध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासह  मिर्झापूरला या आधी भेट दिली असल्याची आठवण त्यांनी करून दिली.

गेल्या दोन दिवसात पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटीत  झालेल्या दोन्ही प्रकल्पांची कोनशिला ठेवल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

ते म्हणाले की, चार दशकांपूर्वी बनसागर  प्रकल्पाची कल्पना मांडण्यात आली होती. तर कोनशिला समारंभ १९७८ साली  करण्यात आला, परंतु या  प्रकल्पाच्या कामाला अनावश्यक विलंब झाला. ते म्हणाले की, २०१४नंतर, हा प्रकल्प प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेचा एक भाग झाला असून आता तो पूर्ण करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणाकरता केलेल्या उपाययोजनांबद्दल बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, खरीप पिकांसाठी कमाल पाठिंबा मूल्यात नुकतीच वाढ करण्यात आली आहे.

गरीब शेतकऱ्यांना स्वस्त आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी घेतलेल्या उपाय योजनांविषयी पंतप्रधानांनी माहिती सांगितली. स्वच्छ भारत मिशन देखील रोग नियंत्रणासाठी प्रभावी सिद्ध झाले असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की आरोग्य आश्वासन योजना - आयुष्यमान भारत लवकरच सुरु होईल. त्यांनी केंद्र शासनाच्या इतर सामाजिक कल्याण योजनांबाबत हि माहिती सांगितली.

 

B.Gokhale/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1538733) आगंतुक पटल : 121
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English