पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 7 जुलै 2018 रोजी राजस्थानला भेट देणार

Posted On: 06 JUL 2018 4:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 जुलै 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 जुलै 2018 रोजी राजस्थानातील जयपूरला भेट देणार आहेत.

एका भव्य जनसभेत पंतप्रधानांसमोर केंद्र सरकार आणि राजस्थान सरकारच्या योजनांचे 12 लाभार्थी त्यांचे अनुभव दृकश्राव्य माध्यमातून सांगणार आहेत. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे या सादरीकरणाला उपस्थित राहणार आहेत.

या योजना पुढीलप्रमाणे

  1. प्रधानमंत्री उज्ज्‍वला योजना
  2. प्रधानमंत्री मुद्रा योजना
  3. प्रधानमंत्री आवास योजना
  4. कौशल्य भारत
  5. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम
  6. मुख्यमंत्री राजश्री योजना
  7. भमाशाह आरोग्य विमा योजना
  8. मुख्यमंत्री जल स्वावलंबन अभियान
  9. श्रमिक कल्याण कार्ड
  10. मुख्यमंत्री पालनहार योजना
  11. छात्र स्कूटी वितरण योजना
  12.  दीनदयाळ उपाध्याय वरिष्ठ नागरिक तीर्थयात्रा योजना

पंतप्रधान 2,100 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 13 शहरी पायाभूत प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. यातील प्रमुख प्रकल्प पुढीलप्रमाणे

  • उदयपूरसाठी एकात्मिक पायाभूत पॅकेज
  • अजमेरसाठी उन्नत रस्ते प्रकल्प
  • अजमेर, भिलवाडा, बिकानेर, हनुमान गड, सिकार आणि माऊंट अबूमधील पाणीपुरवठा आणि सांडपाणी व्यवस्था प्रकल्प
  • ढोलपूर, नागौर, अलवार आणि जोधपूरमधील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचा दर्जा सुधारणा
  • बुंदी, अजमेर आणि बिकानेर जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रकल्प (शहरी)
  • दसरा मैदान (टप्पा-2), कोटा

पंतप्रधान जनसभेलाही संबोधित करणार आहेत.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor




(Release ID: 1538011) Visitor Counter : 113


Read this release in: English