रेल्वे मंत्रालय
मुंबईत अंधेरी स्थानकाजवळ पादचारी पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर कोसळला
जीवितहानी नाही, 5 जण जखमी
गोरेगाव ते वांद्रे स्थानकांदरम्यान पश्चिम उपनगरीय रेल्वे वाहतूक विस्कळीत
प्रविष्टि तिथि:
03 JUL 2018 1:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2018
मुंबईत अंधेरी स्थानकाजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमाराला पादचारी पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळला. गोरेगाव आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्यांना कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वे डॉक्टरांचे विशेष पथक जखमींवर उपचार करत आहे. या दुर्घटनेत ओव्हरहेड वायर्सचंही नुकसान झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल, पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि रेल्वेचे अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. विरार ते गोरेगाव आणि वांद्रे ते चर्चगेट दरम्यान रेल्वे वाहतूक सुरू आहे. बोरीवली आणि वांद्रे स्थानकांदरम्यान खोळंबलेल्या प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने 27 बसेसची व्यवस्था केली आहे.
अंधेरी-विलेपार्ले दरम्यान हार्बर मार्गावर दुपारी 2 वाजता रेल्वे वाहतुकीला मंजुरी मिळण्याची शक्यता असून त्यानंतर गोरेगाव-चर्चगेट आणि गोरेगाव-सीएसएमटी दरम्यान गाड्या धावतील. अप आणि डाऊन जलद मार्गावरची वाहतूक संध्याकाळी 6 नंतर तर धीम्या मार्गावरची वाहतूक मध्यरात्री सुरू होईल. या दुर्घटनेमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम झाला असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
रेल्वेचे हेल्पलाईन क्रमांक
अंधेरी- 022 67630054
चर्चगेट – 022 67622540
बोरीवली – 022 67634053
मुंबई सेंट्रल – 022 67644257
सुरत – 0261 2401791
N.Sapre/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1537456)
आगंतुक पटल : 94
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English