मंत्रिमंडळ
आरोग्यनिगा क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि बहारीनमध्ये सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
27 JUN 2018 4:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, आरोग्यनिगा क्षेत्रातील सहकार्याकरिता भारत आणि बहरीनमध्ये सामंजस्य करारासाठी मंजुरी दिली.
सामंजस्य करारात सहकार्यासाठी पुढील क्षेत्र समाविष्ट करण्यात आली आहेत.
- प्रकाशने आणि संशोधन परिणामांसह माहितीचे आदानप्रदान
- एकमेकांच्या देशातील सरकारी अधिकाऱ्यांचे, शैक्षणिक कर्मचाऱ्यांचे, शिक्षकांचे, विद्वानांचे, तज्ञांचे आणि विद्यार्थ्यांचे दौरे
- कार्यशाळा आणि प्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये सहभाग.
- खासगी क्षेत्रात तसेच प्रबोधिनी स्तरावर आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन गतिविधींना प्रोत्साहन देणे.
- परस्परांच्या सहमतीने निर्धारित सहकार्याचे अन्य विषय
सहकार्याच्या व्यापक विवरणासाठी आणि या सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीच्या देखरेखीसाठी एक कार्यकारी गट स्थापन केला जाईल.
B.Gokhale/S.Kakade/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1536765)
आगंतुक पटल : 109
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English