पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशातील मोहनपुरा सिंचन प्रकल्प पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित
Posted On:
23 JUN 2018 3:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोहनपुरा प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. हा प्रकल्प राजगढ जिल्ह्यातील शेत जमिनींना सिंचनाची सुविधा देईल. तसेच या प्रकल्पामुळे या भागातील गावांना पिण्याच्या पाण्याची सुविधा पुरविता येईल. पंतप्रधानांनी विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना राबविण्यासाठी पायाभरणी केली.
मोहनपुरा येथे मोठ्या जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधानांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी डॉ. मुखर्जी यांनी, प्रत्येक राष्ट्राला स्वतःच्या सुरक्षिततेसाठी उर्जा आणि प्रयत्नांची जोड द्यावी लागते असे सांगितल्याची आठवण करून दिली. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे औद्योगिक धोरण, शिक्षण आणि महिला सशक्तीकरण यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी योगदान दिले. डॉ. मुखर्जी यांनी शिक्षण, आरोग्य व सुरक्षा या विषयावर भर दिला. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारची योजना जसे की कौशल इंडिया मिशन, स्टार्ट अप इंडिया, मुद्रा योजना आणि मेक इन इंडिया या सर्वांमध्ये डॉ. मुखर्जींचा दृष्टीकोन आहे.
पंतप्रधान म्हणाले की राजगड जिल्हा सरकारद्वारे ओळखल्या जाणाऱ्या आकांक्षात्मक जिल्ह्यांपैकी एक आहे आणि आता विकास कामांचा वेग वाढविला जाईल. ते म्हणाले की, केंद्र सरकार देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवून 21 व्या शतकात भारताला नव्या उंचीवर नेण्यासाठी कार्य करत आहे. त्यांनी कृषी क्षेत्राद्वारे केलेल्या कामांकरिता आणि त्याच्या विकासाच्या पुढाकारांसाठी मध्य प्रदेश सरकारचे कौतुक केले. राज्यातील सिंचन क्षेत्राच्या वाढीसाठी त्यांनी राज्य सरकारची प्रशंसा केली. ते म्हणाले की, राज्य सरकारच्या सिंचन निधीस मदत करण्याकरिता केंद्र सरकार पाठिंबा देत असून, प्रधान मंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यात 14 प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. त्यांनी सूक्ष्म सिंचनावर जोर दिला असल्याचे सांगितले.
पंतप्रधानांनी केंद्र सरकारद्वारे शेती क्षेत्रासाठी घेतलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला जसे की, मृदा आरोग्य कार्ड, फसल बिमा योजना, ई-एनएएम इत्यादी. त्यांनी उज्ज्वला योजना आणि मुद्रा योजनेचे लाभ देखील सांगितले.
B.Gokhale/D.Rane
(Release ID: 1536397)
Visitor Counter : 114