पंतप्रधान कार्यालय

सिंगापूर येथे व्यापार आणि समुदाय कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण (31 मे, 2018)

Posted On: 31 MAY 2018 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 मे 2018

 

नमस्ते सिंगापूर!

शुभ संध्यकाळ!

नी हाओ

सलामत दतांग

वणक्कम

इस्वरन मंत्रीजी,

प्रमुख व्यावसायीकांनो,

माझ्या सिंगापूरच्या मित्रांनो,

सिंगापूरमधील भारतीय वंशाचे सदस्य,

तुम्हा सर्वांना माझा नमस्कार!

आज या कार्यक्रमात आपण भारत आणि सिंगापूर यांच्यामधील संबंधाची ताकद बघत आहोत. हा आपला वारसा आहे; आपले लोकं आहेत; आणि प्राचीन काळापासून चालत आलेली आपली भागीदारी आहे. ही कृपा आणि वैभव आहे आणि दोन सिंहांच्या डरकाळ्या आहेत. सिंगपुरला येणं हा नेहमीच एक आनंददायी अनुभव असतो.हे असे शहर आहे जे नेहमीच प्रेरणा देत असत. सिंगापूर हे जरी एक लहान बेट असले तरी त्याची व्याप्ती जागतिक आहे. एखाद्या देशाला जागतिक स्तरावर जर एखादे यश संपादन करायचे असेल किंवा आपली ताकद सिद्ध करायची असेल तर त्या देशाचे आकारमान हे कधीच अडथळा ठरत नाही हे आपल्या सर्वांना या महान देशाने दाखवून दिले आहे.

परंतु सिंगापुरचे यश हे त्याच्या बहु-सांस्कृतिक समाजाच्या सुसंवादात, त्याच्या विविध उत्सवांमध्ये देखील दडलेले आहे जे एका वेगळ्या आणि अद्वितीय सिंगापूरची ओळख आहे. आणि, या सुंदर अशा मोझॅकमध्ये, एक सुंदर आणि रंगीत असा एक प्राचीन धागा आहे, जो भारत आणि सिंगापूरला बांधतो.

मित्रांनो,

शतकांपूर्वी भारतातील लोकांनी सिंगापूर मार्गेच दक्षिणपूर्व आशियाला प्रस्थान केले होते. मानवी दुवा खोल आणि टिकाऊ आहे. तो सिंगापूरमधील भारतीयांमध्ये आहे. आणि, आजची ही संध्याकाळ तुमच्या उपस्थितीने,तुमच्या उर्जेने, तुमच्या प्रतिभेने आणि तुमच्या यशाने प्रकाशमय झाली आहे.

आपण इतिहासाच्या किंवा जागतिकीकरणाच्या संधींमुळे येथे आला असाल, किंवा पिढ्यांपिढ्यांपूर्वी तुमचे पूर्वज येथे आले असतील  किंवा या शतकात तुम्ही येथे आला असाल; तुम्ही प्रत्येकजण सिंगापूरच्या अद्वितीय निर्मितीचा आणि त्याच्या प्रगतीचा भाग आहात.

याबदल्यात, सिंगापूरने तुम्हाला, तुमच्या गुणवत्तेला आणि तुमच्या कष्टांना स्वीकारले आहे. सिंगापूरमध्ये तुम्ही भारताच्या विविधतेचे प्रतिनिधित्व करता. जर तुम्हाला एकाच शहरात भारतातील सर्व उत्सव पहायचे असतील किंवा काही आठवडे ते सण साजरे करायचे असतील, तर तुम्ही सिंगापूरला नक्की भेट द्या.

आता भारतीय खाद्यपदार्थांसाठी देखील हे तितकेच खरे आहे! या छोट्या भारतात पंतप्रधान ली यांनी मला दिलेली रात्रीची भोजनाची मेजवानी अजूनही आठवते.

तामिळ ही येथील एक अधिकृत भाषा आहे. येथे मुलं शाळेत इतर 5 भारतीय भाषा देखील शिकू शकतात हा सिंगापूरच्या भारताप्रती असलेल्या अतूट भावनेचा पुरावा आहे. हे शहर भारतीय संस्कृतीचे सर्वोत्तम ठिकाण आहे. सिंगापूर सरकार कडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे येथे एक प्रतिभाशाली भारतीय समाजा उभा राहिला आहे.

येथे सिंगापूर मध्ये तुम्ही पारंपारिक भारतीय खेळांमध्ये संपूर्ण स्पर्धा सुरु केली आहे. हे तुमच्या तारुण्याच्या आठवणी जाग्या करते आणि मुलांना खो-खो आणि कबड्डीशी जोडायला मदत करते.

आणि, 2017 मध्ये, या शहरातील 70 केंद्रांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन आयोजित करण्यात आला होता. म्हणजेच प्रत्येक 10 चौरस कि.मी. साठी एक केंद्र होते.

जगातील इतर कुठल्याही शहरात योगासाठी इतकी आस्था नाही. श्री रामकृष्ण मिशन आणि श्री नारायण मिशन यासारख्या संस्था येथे गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. लोकांमध्ये कुठलाही भेदभाव न करता समाजाची करत असलेली सेवा ही भारत आणि सिंगापूर बांधणीचे मूल्य प्रतिबिंबित करतात.

सिंगापूर आणि या प्रदेशातून प्रवास करतांना भारतातील महान विचारवंत स्वामी विवेकानंद आणि कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना भारताला पूर्वेला जोडणारा एक समान दुवा आढळला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरच्या भूमीतूनच भारताच्या स्वातंत्र्यासाठी चलो दिल्लीची हाक दिली होती आणि प्रत्येक भारतीयाच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली होती.

1948 मध्ये महात्मा गांधी यांच्या अस्थीचा एक भाग क्लिफफोर्ड पिअर येथे विसर्जित करण्यात आला होता. समाजातील विविध घटकातील हजारो लोकं याचे साक्षीदार आहेत. अस्थी विसर्जन केल्यानंतर विमानातून गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. लोकांनी त्यावेळी समुद्राच्या पाण्याचे काही घोट प्यायले.

या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून परवा मला क्लिफफोर्ड पिअर येथे एका फलकाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्य प्राप्त होणार आहे. हा क्षण आजही महात्मा गांधीची सार्वभौमिक मूल्य अधोरेखित करतो.

मित्रांनो,

या विलक्षण वारशाच्या पायावर, आपल्या मानवी दुव्यांची संपत्ती आणि आपल्या सामायिक मूल्यांच्या शक्तीवर, भारत आणि सिंगापूरची भागीदारी उभारली जात आहे. धोरणात्मक भागीदारीची परीक्षा उत्तीर्ण झालेले हे संबंध आहेत. जेव्हा भारताने आपले दरवाजे जगासाठी खुले केले आणि आपला रोख पूर्वेकडे वळवला तेव्हा सिंगापूर हा भारत आणि आसियान देशांदरम्यानचा दुवा होता. भारत आणि सिंगापूर यांच्यातील राजकीय संबंध सर्वांत उत्कट आणि जवळचे आहेत. त्यांच्यामध्ये कोणतीही एकही स्पर्धा किंवा दावे किंवा शंका नाहीत.

सामायिक दृष्टीकोन असलेली ही एक भागीदारी आहे. दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध हे सर्वात बलवान आहेत. माझे लष्कर सिंगापूरच्या लष्कराची नेहमीच प्रशंसा आणि आदर करते. भारत आणि सिंगापूरच्या नौदलात सतत युद्ध सराव सुरु असतो.

ते आता रौप्य महोत्सव साजरा करत आहेत. भारतात प्रशिक्षणासाठी सिंगापूरच्या सैन्याचे आणि हवाई दलाचे स्वागत करतांना आम्हाला अभिमान वाटत आहे. आमची जहाजे नियमितपणे एकमेकांना भेट देतात.

आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आमच्या नौदलाच्या जहाजाला भेट दिली असेल. देखील, मी परवा चांगी नौदल तळावर भारतीय आणि सिंगापूर नौदलाच्या जहाजांना भेट देण्यास उत्सुक आहे.

नियम-आधारित ऑर्डर, सर्व राष्ट्रांची सार्वभौम समानता आणि वाणिज्य आणि प्रतिबद्धतेच्या मुक्त आणि खुल्या मार्गासंबधी आंतराष्ट्रीय मंचावर आमची एकवाक्यता आहे. अर्थव्यवस्था ह्या आपल्या संबंधांच्या हृदयाचे ठोके आहेत.

भारताच्या जागतिक प्रतिबद्धतेच्या आघाडीवरील ही भागीदारी आहे. सिंगापूर हा भारतासाठी एक प्रमुख गुंतवणूक स्रोत आणि लक्ष्य आहे. सिंगापूर हा पहिला देश आहे ज्याच्यासोबत आम्ही एक व्यापक आर्थिक सहकार्य करार केला.

भारतातील 16 शहरांमधून दर आठवड्याला सुमारे २५० उड्डाणे सिंगापूरसाठी प्रस्थान करतात. आणि यामध्ये अजून वाढ होणार आहे. भारत सिंगापूरमधील पर्यटकांचा तिसरा सर्वात मोठा स्रोत आहे. सिंगापूरला अद्यावत आणि स्पर्धात्मक वातवरणात टिकून राहण्यासाठी आमच्या माहिती तंत्रज्ञान कंपन्या मदत करतात.

भारताच्या अनेक विकास उपक्रमांमध्ये सिंगापूर एक प्रमुख भागीदार आहे: स्मार्ट शहरे, शहरी समाधान, आर्थिक क्षेत्र, कौशल्य विकास, बंदर, रसद, विमानचालन आणि औद्योगिक उद्याने.

म्हणून, भारत आणि सिंगापूर एकमेकांच्या समृद्धीसाठी योगदान देत आहेत. आणि, आता डिजिटल जगासाठी आम्ही नवीन भागीदारी करत आहोत. पंतप्रधान ली आणि मी आत्ताच एका  तंत्रज्ञान, नवोन्मेश आणि उपक्रमांच्या प्रदर्शनाला भेट दिली. हे भारत आणि सिंगापुरचे तेजस्वी तरुण आहेत.

त्यातील बऱ्याच प्रतीभावान भारतीय तरुणांनी सिंगापूरला आपली कर्मभूमी म्हणून स्वीकारले आहे. ते भारत, सिंगापूर आणि आशियान यांच्यातील नवोन्मेश आणि उपक्रम यांच्यातील दुवा आहेत. थोड्या वेळापूर्वी, आम्ही रुपे, भिम आणि यूपीआयचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्घाटन पाहिले.

सिंगापूरमध्ये हे सुरू करणे खूपच स्वाभाविक आहे! प्रशासन आणि समावेशनासाठी आम्ही मोबाईल आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या शक्तीच्या वापरासाठी एकत्र कार्य करणार आहोत. एकत्रितपणे, आम्ही पुन्हा एकदा नविन भागीदारी उभारणार आहोत.

सिंगापूर स्वत: साठी एक नवीन भविष्य घडवत असतांनाच संधीच्या नवीन जागतिक आघाडीवर भारत उदयास येत आहे. गेल्या वर्षी वस्तू आणि सेवा करासारखी संरचनात्मक सुधारणा केली असली तरी देखील आम्ही जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहोत.

आणि आम्ही त्या मार्गावर सतत मार्गक्रमण करत आहोत. आमची अर्थव्यवस्था अधिक स्थिर बनली आहे.

वित्तीय तूट कमी झाली आहे. महागाई दर खाली आला आहे. चालू खाते तूट व्यवस्थित आहे. चलन स्थिर आहे. आणि परकीय चलन साठा आत्तापर्यंतच्या उच्चस्तरावर आहे.

भारतात, सध्या वेगाने बदल होत आहेत. नव भारत आकार घेत आहेआणि त्यासाठी अनेक कारणे आहेत.

एक, आर्थिक सुधारणा वेगाने होत आहेत. गेल्या 2 वर्षात केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या दहा हजार उपाययोजनांमुळे व्यापार सुलभीकरण क्रमवारीत आम्हाला 42 व्या स्थानवर पोहोचण्यास मदत झाली आहे.

1,400 पेक्षा अधिक जुने कायदे रद्द करण्यात आले आहेत. भारत जगातील सर्वाधिक खुल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. विदेशी गुंतवणूकदार जवळजवळ सर्व क्षेत्रांत 100% गुंतवणूक करू शकतात. खरोखर, भारतात 90% पेक्षा जास्त गुंतवणूक या मार्गाने होते.

दोन, कर प्रणालीमध्ये बदल केले आहेत: कर दर कमी केले, स्थिरता वाढवली, कर विवादांचा जलद निपटारा आणि इलेक्ट्रॉनिक फाईलिंग सिस्टम. स्वातंत्र्योतर काळापासून वस्तू आणि सेवा कर ही सर्वात मोठी कर सुधारणा आहे. यामुळे देशात बाजार एकीकरण झाले आणि कर आधार वाढला.

हे सोपे काम नव्हते. पण, हे यशस्वीरित्या पार पडले. आणि, त्यामुळे नवीन आर्थिक संधी निर्माण झाल्या आहेत. आमच्या वैयक्तिक आयकरामध्ये सुमारे 20 दशलक्षने वाढ झाली आहे.

तीन, आमचे पायाभूत सुविधा क्षेत्र जलद गतीने विस्तारत आहे. गेल्या वर्षी, आम्ही जवळजवळ 10 हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले - म्हणजे 27 किलोमीटर प्रतिदिन, काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत हा  वेग दुप्पट आहे.

रेल्वे रुळांच्या वाढीचा वेग दुप्पट झाला आहे. अनेक शहरांमध्ये मेट्रो रेल, सात जलद गती रेल्वे प्रकल्प, समर्पित फ्रेट कॉरिडोर आणि 400 रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाने रेल्वे क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवण्यात येणार आहे.

इतर प्रकल्पांमध्ये 10 हरित विमानतळे; पाच नवीन मोठे बंदर, राष्ट्रीय जलमार्ग म्हणून 111 नद्या; आणि 30 पेक्षा जास्त लॉजिस्टिक्स पार्कचा समावेश आहे. आम्ही फक्त तीन वर्षांत 80 हजार मेगावॅट वीज निर्माण केली आहे.

आणि, नवीकरणीय उर्जा क्षेत्रात, आम्ही जगातील सहाव्या क्रमांकाचे उत्पादक बनलो आहोत. हरित आणि शाश्वत भविष्यासाठी ही आमची बांधिलकी आहे. जगातील सर्वात मोठी पायाभूत सुविधांची गाथा भारतात जन्माला येत आहे.

चार, आमचे उत्पादन क्षेत्र सावरत आहे. मागील तीन वर्षात थेट परकीय गुंतवणुकीत वाढ झाली आहे- वर्ष 2013-14 च्या 36 अब्ज अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वर्ष 2016- 17 मध्ये 60 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी वाढ झाली आहे. सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योगक्षेत्रांवर विशेष लक्ष दिले जात आहे.

आम्ही क्षेत्र-विशिष्ट आधुनिकीकरण आणि उत्पादकता कार्यक्रम सुरू केले आहेत, कॉर्पोरेट कर दर कमी केला आणि कर लाभ अधिक आकर्षक आणि सोपे केले आहेत. भारतीय स्टार्टअप क्षेत्राचा विकास होत आहे आणि आता जगतिक क्रमवारीत आता हे तिसऱ्या स्थानावर आहे.

माझी आवडती योजना, अर्थातच, मुद्रा योजना जी गरीबांना आणि वंचितांना सूक्ष्म कर्ज पुरवठा करते. गेल्या तीन वर्षात 90 अब्ज अमेरिकी डॉलर्सपेक्षा अधिक कर्जाचे वितरण करण्यात आले आहे- यापैकी 74 टक्के कर्ज महिलांना वितरीत करण्यात आले आहे. होय, 74% महिलांना!

पाच, आम्ही आर्थिक समावेशनावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. ज्यांचे बँकेत खाते नव्हते अशा लोकांसाठी गेल्या तीन वर्षांत आम्ही 316 दशलक्ष बँक खाती उघडली आहेत. आता, 99% भारतीय कुटुंबांचे बँकेत खाते आहे.

प्रत्येक नागरिकांच्या स्वत्वाचा हा एक नवीन स्रोत झाला आहे, समावेश आणि सबलीकरणाची ही एक उल्लेखनीय गाथा आहे, या खात्यांमध्ये 12 अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक रक्कम झाली आहे. सरकारने 50 अब्ज अमेरिकी डॉलरपेक्षा अधिक रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केली आहेत. त्यांना आता निवृत्ती वेतन आणि विम्याचा लाभ मिळणार आहे- जे कधी स्वप्नवत होते.आता बँकिंग क्षेत्राचा वेगाने विस्तार होत आहे.

सहा, भारतामध्ये डिजिटल क्रांती होत आहे. प्रत्येकासाठी बायोमेट्रिक ओळख, जवळजवळ प्रत्येकाच्या खिशात मोबाईल फोन आणि प्रत्येकाचे एक बँक खाते, प्रत्येक भारतीयाचे जीवन बदलत आहे.

आणि ते भारतातील इतर सर्व गोष्टींमध्ये परिवर्तन घडवून आणत आहे: प्रशासन, सार्वजनिक सेवा, गरीबांपर्यंत फायदे पोहोचविणे, गरीबातील गरीब व्यक्तीला निवृत्ती वेतन आणि बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे. उदाहरणार्थ, डिजिटल व्यवहार वेगाने वाढत आहेत.

2017 मध्ये, केवळ युपिआय - आधारित व्यवहार सात हजार टक्के वाढले. जानेवारीमध्ये 2 ट्रिलियन अमेरिकन डॉलरचे डिजिटल व्यवहार झाले. आम्ही दोन लाख पन्नास हजार ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीने जोडत आहोत आणि त्या प्रत्येक पंचायतीमध्ये एक सामाईक सेवा केंद्र उभारत आहोत.

यामुळे अनेक डिजिटल सेवांची आणि हजारो ग्रामीण रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अटल अभिनव मोहिमेअंतर्गत, आम्ही 100 इनक्यूबेशन केंद्र उघडत आहोत आणि आमच्या मुलांनी प्रवर्तक आणि नोकरी निर्माते होण्यासाठी 2400 टिंकरिंग प्रयोगशाळा उघडल्या आहेत. प्रदर्शकांपैकी एक आज या प्रयोगशाळेपैकी आहे.

सात, भारत पुढील दोन दशकांत शहरीकरणाचा सर्वात मोठा अनुभव घेईल. हे एक आव्हान आहे, पण एक मोठी जबाबदारी आणि संधी देखील आहे.

आम्ही 100 शहरे स्मार्ट शहरांमध्ये रूपांतरित करण्यासाठी काम करीत आहोत आणि 115 महत्वाकांक्षी जिल्हे प्रगतीपथावर आहेत.

मोठे परिवर्तन, कचरा व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण, शाश्वत आवास आणि परवडणारे गृहनिर्माण आमच्यासाठी फारच महत्त्वाचे कार्यक्रम आहेत.

आठ, आम्ही कौशल्यामध्ये गुंतवणूक करत आहोत आणि आपल्या 800 दशलक्ष युवकांना ओळख आणि संधी उपलब्ध करून देण्यासाठी उच्च शिक्षणाचे मानदंड वाढवत आहोत. सिंगापूरपासून धडा घेत आम्ही कोळसा विकासाच्या प्रगत संस्था स्थापन करत आहोत. आणि आमच्या उच्च शिक्षण प्रणालीला आणखी मजबूत करण्यासाठी या आर्थिक वर्षात, आम्ही 15 अब्ज अमेरिकी डॉलरचा कार्यक्रम सुरू केला आहे.

नऊ, कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यात येत आहे, दशकांपूर्वी झालेल्या हरित क्रांतीनंतर जे कधीच देण्यात आले नव्हते. जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी केली जात असतील आणि नव भारताचाजन्म झाला असेल म्हणजेच 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आमचे ध्येय आहे.

यासाठी आम्ही तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग, इंटरनेट, डिजिटल वित्तीय प्रणाली, सॉफ्ट क्रेडिट, विमा, मृदा आरोग्य सुधारणा, सिंचन, किंमत आणि कनेक्टिव्हिटीचा वापर करत आहोत.

दहा, 2022 पर्यंत प्रत्येक नागरिकाचे जीवन सुलभ झाले पाहिजे. याचा अर्थ, उदाहरणार्थ, 50 दशलक्ष नवीन घरे बांधली पाहिजेत, जेणेकरून 2022 मध्ये प्रत्येकाच्या डोक्यावर छप्पर असेल.

मागील महिन्यात, आम्ही एक मैलाचा दगड गाठला. आमच्या 600 हजार गावांना आता पॉवर ग्रिडने जोडले आहे. आम्ही प्रत्येक घरासाठी इलेक्ट्रिक कनेक्शन प्रदान करण्यासाठी देखील काम करीत आहोत.

आम्ही या वर्षी आयुषमान भारत या राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचा शुभारंभ केला आहे. या योजनेंतर्गत वर्षाला  8000 अमेरिकन डॉलर खर्च करून 100 दशलक्ष कुटुंब किंवा 500 दशलक्ष भारतीयांवर उपचार करण्यात येणार आहेत. जगातील ही सर्वात मोठी आरोग्यसेवा योजना आहे.

दर्जात्मक जीवन हे देखील स्वच्छ आणि शाश्वत विकासाशी निगडीत आहे. ते आमच्या प्रमुख उद्देशांपैकी एक आहे. ते आमच्या वारसा आणि पृथ्वीच्या भविष्याशी असेलेल्या बांधिलकीच्या मुळाशी आहे. आणि, भारतातील सार्वजनिक धोरण आणि आर्थिक निवडीच्या प्रत्येक पैलूची माहिती आपल्याला कळवतो.

यामध्ये स्वच्छ भारत, स्वच्छ नद्या, स्वच्छ हवा आणि स्वच्छ शहरे यांचा समावेश आहे आणि हे सर्व बदल फक्त आणि फक्त एकाच कारणामुळे घडत आहेत: आपली माणसे. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात 65% लोकांचे वय 35 वर्षांहून कमी आहे, आणि नव भारतचे स्वप्न साकारण्यासाठी हे सर्व उत्सुक आहेत. ते प्रशासन आणि राजकारणात देखील बदल घडवून आणत आहेत.

मित्रांनो,

भारतामधील आर्थिक सुधारणांच्या गति आणि दिशा बद्दल पूर्ण स्पष्टता आणि आत्मविश्वास आहे. भारतात व्यवसाय करणे आम्ही सुलभ आणि सुकर बनवू. आम्ही एका खुल्या, स्थिर आणि योग्य आंतरराष्ट्रीय व्यापार प्रणालीसाठी कार्य करू.आणि पूर्वेशी असलेली आमची प्रतिबद्धता अधिक मजबूत होईल आणि अर्थव्यवस्था आमच्या  अॅक्ट ईस्ट पॉलिसीचा अविभाज्य भाग राहतील.

आम्ही एक सर्वसमावेशक उचित, संतुलित करार पाहू इच्छितो जो सर्व देशांचा व्यापार आणि गुंतवणुकीचा विकास करेल. आम्ही आताच भारत-सिंगापूर व्यापक आर्थिक सहकार्य कराराचा आढावा घेतला आहे आणि आम्ही तो पुढे वाढविण्यासाठी प्रयत्न करू.

प्रादेशिक व्यापक आर्थिक भागीदारीसाठी लवकर निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही आसीयान मधील सर्व लोकांसोबत कार्य करू. या प्रदेशासोबत भारताचे संबध जसजसे वाढत आहेत तसतसे सिंगापूर हा आसियान आणि पूर्वेकडील देशांसाठी प्रवेशद्वार सिद्ध होणार आहे. यावर्षी आसियानचे अध्यक्षपद सिंगापूरला मिळाल्यामुळे भारताचे आसियान देशांसोबतचे संबंध भविष्यात अधिक मजबूत होतील.

मित्रांनो,

शेवटी सिंगापूरसाठी, भारतापेक्षा चांगली संधी नाही. काहीच देशांमध्ये भारत आणि सिंगापूर इतके साम्य आणि संभाव्य क्षमता असतात. आपला समाज हा एकमेकांसाठी आरसा आहे आणि भविष्यात देखील हीच परिस्थिती राहील अशी आशा आहे.

आम्ही कायद्याच्या नियमावर आधारित जगाचा पाठपुरावा करतो. खुला समुद्र आणि एका स्थिर व्यापार प्रणालीद्वारे आम्ही जोडले आहोत. याशिवाय, आपल्याकडे जगातील सर्वात हुशार, गतिमान, व्यावसायिक आणि समर्पित भारतीय समाज आहे , ज्यांना सिंगापुरीयन असल्याबद्दल अभिमान आहे.

भविष्य हे अमर्यादित संधींचे विश्व आहे. हे आमच्या मालकीचे आहे. महात्वाकांशी बनणे आणि ते साध्य करण्याचे धाडस दाखवणे हे आपल्यावर अवलंबून आहे. आजच्या या संध्याकाळने आपल्याला सांगितले की आपण योग्य मार्गावर आहोत. दोन सिंह भविष्यात एकत्र मार्गक्रमण करतील.

धन्यवाद.

खूप धन्यवाद.

 

 

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 



(Release ID: 1536003) Visitor Counter : 127


Read this release in: English