निती आयोग

आणखी 3000 अटल टिंकरिंग प्रयोगशाळांची घोषणा

Posted On: 12 JUN 2018 2:58PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  12 जून 2018

 

नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत अटल टिंकरिंग प्रयोगशाळा निर्माण करण्यासाठी आणखी 3000 शाळांची निवड करण्यात आली आहे. यामुळे अटल टिंकरिंग प्रयोगशाळा असणाऱ्या शाळांची संख्या 5,441 होणार आहे. निवड झालेल्या शाळांना या अटल टिंकरिंग प्रयोगशाळांची निर्मिती करण्यासाठी पाच वर्षांकरिता 20 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. देशभरातल्या माध्यमिक शाळांतल्या विद्यार्थ्यांमध्ये कल्पकता आणि उद्योजकतेची जोपासना व्हावी हा या प्रयोगशाळांमागचा उद्देश आहे. लवकरच देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात अटल टिंकरिंग प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. यामुळे कल्पकता, नवनवे शोध यासाठी पोषक वातावरण निर्माण होऊन तंत्रविषयक कल्पकतेमध्ये परिवर्तन घडणे सुलभ होणार आहे.

आणखी 3000 शाळांपर्यंत अटल टिंकरिंग प्रयोगशाळांचा विस्तार करण्यात येणार असल्यामुळे भारताच्या युवावर्गाला थ्रीडी प्रिंटींग, रोबोटिक्स, मायक्रोप्रोसेसर यासारख्या तंत्रज्ञानाचा परिचय सुलभ होईल असे अटल इनोव्हेशन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक रामनाथन रामानन यांनी सांगितले. दैनंदिन जीवनातल्या स्थानिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठीचे केंद्र म्हणून या अटल टिंकरिंग प्रयोगशाळा काम करणार आहेत.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1535134) Visitor Counter : 163
Read this release in: English