महिला आणि बालविकास मंत्रालय
महिलांच्या सक्षमीकरणासाठी मंत्रालयांनी प्रयत्न करावेत – मनेका गांधी
प्रविष्टि तिथि:
07 JUN 2018 5:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 जून 2018
देशातील सर्व स्तरांतील महिलांच्या सक्षमीकरणासाठी सर्व मंत्रालयाने प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी केले आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्र सरकारच्या अखत्यारितील विविध मंत्रालयांना एक पत्र पाठवले आहे.
शासकीय योजनांमध्ये महिलांना केंद्र स्थानी ठेवले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शासकीय योजना किंवा कार्यक्रमांच्या संकल्पनेपासून अंमलबजावणीपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांच्या सक्षमीकरणाकडे विशेष लक्ष दिले जावे, अशी सूचनाही मनेका गांधी यांनी केली आहे. महिला आणि बाल विकास विभागातर्फे राबविण्यात आलेल्या विविध यशस्वी उपक्रमांचा उल्लेख करत त्या यशस्वी करण्यात इतर मंत्रालयाने हातभार लावल्याबद्दल मंत्रीमहोदयांनी त्यांचे आभार मानले आहेत.
B.Gokhale/M.Pange/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1534801)
आगंतुक पटल : 92
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English