मंत्रिमंडळ
आजारी केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांचा पुर्णविराम आणि त्यांच्या चल-अचल संपत्तीच्या निपटाऱ्यासाठी सुधारित मार्गदर्शक तत्वांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
प्रविष्टि तिथि:
06 JUN 2018 6:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जून 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आजारी/ तोट्यात चाललेले केंद्रीय सार्वजनिक उपक्रम कालबद्ध पद्धतीने बंद करणे आणि त्यांची चल-अचल मालमत्ता यांचा निपटारा करण्याबाबत सुधारित मार्गदर्शक तत्वांना मंजुरी दिली आहे. ही मार्गदर्शक तत्वे सप्टेंबर 2016 मध्ये जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांची जागा घेतील.
या मार्गदर्शक तत्त्वांमुळे सीपीएसई बंद करण्यासाठी विविध प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यासाठी एक व्यापक चौकट उपलब्ध होईल. याअंतर्गत सीपीएसई टप्प्याटप्प्याने बंद करण्याची जबाबदारी मंत्रालये / विभाग / सीपीएसईची असेल. प्रशासकीय मंत्रालये/विभाग/ सीपीएसई यांना आधीच कृती योजना तयार ठेवावी लागेल. सीपीएसई बंद करण्याचा प्रस्ताव, वैधानिक आणि अन्य दायित्व निश्चत करणे आणि या सीपीएसईच्या चल आणि अचल मालमत्तांची कालबद्ध पद्धतीने निपटारा करण्यास मदत मिळेल.
बंद होणाऱ्या सीपीएसई कंपनीच्या जमिनीचा वापर गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या संबंधित मार्गदर्शक तत्वानुसार परवडणारी घरे बांधण्यासाठी प्राधान्याने केला जाईल. या कंपन्यांमध्ये अजूनही कर्मचारी काम करत आहेत त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की त्यांना यामुळे त्रास होऊ नये. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना 2007 च्या राष्ट्रीय वेतनानूसार स्वेच्छानिवृत्ती देण्यासाठी समान धोरण आखले जात आहे .
ही मार्गदर्शक तत्त्वे सर्व आजारी/ तोट्यात चाललेल्या सीपीएसईना लागू असेल जे -
- प्रशासकीय मंत्रालय / विभागाकडून बंदीला मंजुरी/ तत्वतः मंजुरी मिळाली असेल
- सीपीएसई बंद करण्याचा निर्णय प्रशासकीय मंत्रालय / विभागाने घेतल्यानंतर सक्षम अधिकाऱ्याची मंजुरी अद्याप मिळायची आहे.
B.Gokhale/S.Kane/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1534672)
आगंतुक पटल : 118
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English