मंत्रिमंडळ

नदी जोड प्रकल्पासाठीच्या विशेष समितीच्या सद्यस्थिती-प्रगतीचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा

Posted On: 06 JUN 2018 6:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, नदी जोड प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीच्या सद्यस्थिती आणि प्रगतीचा आढावा घेण्यात आला. या समितीने आपला अहवाल आज मंत्रिमंडळाला सादर केला.

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने 27-2-2015 रोजी दिलेल्या निकालाला अनुसरून तसेच, त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या रिट याचिकेवर सुनावणी करतांना, नदी जोड प्रकल्पाच्या अध्ययनासाठी समिती नियुक्त करण्याचे निर्देश, न्यायालयाने केंद्र सरकारला दिले होते, त्यानुसार ही समिती तयार करण्यात आली आहे. 

या समितीने नदी जोड प्रकल्पाबाबत दिलेल्या अहवालात, केन-बेटवा जोड, दमणगंगा-पिंजाळ जोड, पारा-तापी-नर्मदा जोड आणि इतर हिमालयन आणि बारमाही नद्यांच्या जोडणीविषयीच्या अध्ययनाचा सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

 

 

 

B.Gokhale/ R.Aghor/D.Rane

 

 


(Release ID: 1534670)
Read this release in: English