कंपनी व्यवहार मंत्रालय

नादारी आणि दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) अध्यादेश 2018 वर राष्ट्रपतींचे शिक्कामोर्तब

प्रविष्टि तिथि: 06 JUN 2018 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2018

 

नादारी आणि दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) अध्यादेश 2018 ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज मंजुरी दिली. या अध्यादेशामुळे बांधकाम व्यावसायिकांकडून घर विकत घेणाऱ्यांना वित्तीय पतधारक अर्थात फायनान्शियल क्रेडिटर असा दर्जा मिळणार आहे.

अध्यादेशात करण्यात आलेल्या दुरूस्तीनुसार ज्या बांधकाम व्यावसायिकांकडे ग्राहकाने घर विकत घेण्यासाठी नोंदणी केली असेल, तो व्यावसायिक किंवा त्याची कंपनी दिवाळखोरीत निघाली तरी ग्राहकाने भरलेले पैसे वाया जाणार नाहीत, तर ते परत मिळू शकणार आहेत. अशा प्रकरणात संबंधित व्यावसायिकाच्या मालमत्तांची विक्री करून विहित नियमांच्या आधारे ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याची तरतूद या अध्यादेशाद्वारे करण्यात आली आहे.

 

 

 

B.Gokhale/M.Pange/D.Rane

 

 


(रिलीज़ आईडी: 1534619) आगंतुक पटल : 157
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English