अर्थ मंत्रालय
प्राप्तीकर विभागाने सुरू केली बेनामी व्यवहारांबाबत माहिती देणाऱ्याला इनाम देणारी योजना
काळा पैसा उघडकीला आणणे आणि कर चुकवेगिरी कमी करण्यासाठी लोक सहभाग वाढवण्याचा प्राप्तीकर विभागाचा प्रयत्न
Posted On:
01 JUN 2018 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2018
काळा पैसा उघडकीला आणणे आणि कर चुकवेगिरी कमी करण्यासाठी लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशाने प्राप्तीकर विभागाने ‘बेनामी व्यवहारांबाबत माहिती देणाऱ्याला इनाम देणारी योजना-2018’ सुरू केली आहे. बेनामी व्यवहार आणि मालमत्तेबाबत तसेच अशा मालमत्तांवर उत्पन्न मिळवणाऱ्यांची माहिती देण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा या योजनेचा उद्देश आहे. अशा व्यवहारांबाबत प्राप्तीकर विभागाच्या तपास संचालनालयाच्या बेनामी प्रतिबंधक विभागाच्या संयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांना विशिष्ट माहिती देणाऱ्या व्यक्तीला 1 कोटी रुपयांपर्यंत इनाम मिळू शकेल.
परदेशातील व्यक्तीही या इनामासाठी पात्र आहेत. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव उघड केले जाणार नाही. या योजनेबाबतची माहिती www.incometaxindia.gov.in या प्राप्तीकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
B.Gokhale/S.Kane/P.Kor
(Release ID: 1534091)