अर्थ मंत्रालय
जीएसटी महसूल संकलन मे 2018
गेल्या आर्थिक वर्षातील जीएसटी संकलनाच्या मासिक सरासरीपेक्षा मे 2018 मधील संकलन अधिक
Posted On:
01 JUN 2018 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2018
मे 2018 मध्ये 94,016 कोटी रुपये वस्तू आणि सेवा कराद्वारे महसूल जमा झाला. यात 15,866 कोटी रुपये सीजीएसटी, 21,691 कोटी रुपये एसजीएसटी, 49,120 कोटी रुपये आयजीएसटी (आयातीवरील 24,447 कोटी रुपये समाविष्ट) आणि 7,339 कोटी रुपये अधिभार (आयातीवरील 854 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे. 1 एप्रिल ते 31 मे 2018 दरम्यान 62.47 लाख जीएसटीआर 3 बी विवरणपत्रे भरण्यात आली.
मे 2018 मध्ये वाटाघाटीनंतर केंद्र सरकारला 28,797 कोटी रुपये तर राज्य सरकारांना 34,020 कोटी रुपये एकूण महसूल मिळाला.
एप्रिल 2018 पेक्षा मे महिन्यातील महसूल संकलन (94,016 कोटी रुपये) कमी असले तरी गेल्या आर्थिक वर्षातील जीएसटी संकलनासच्या मासिक सरासरीपेक्षा (89,885 कोटी रुपये) बरेच अधिक आहे. वर्षसमाप्तीमुळे एप्रिल महिन्यातील महसूल सर्वाधिक आहे.
29 मे 2018 रोजी केंद्र सरकारकडून राज्यांना जीएसटीची नुकसान भरपाई म्हणून 6696 कोटी रुपये वितरित करण्यात आले. त्यामुळे जुलै 2017 ते मार्च 2018 या काळात राज्यांना 47844 कोटी रुपये भरपाई म्हणून देण्यात आले आहेत.
N.Sapre/S.Kane/P.Kor
(Release ID: 1534087)