मंत्रिमंडळ

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारत-मोरोक्को सहकार्याबाबत भारत आणि मोरोक्को यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 23 MAY 2018 5:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारत-मोरोक्को सहकार्याबाबत भारत आणि मोरोक्को यांच्यातील सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. या करारावर 10 एप्रिल 2018 रोजी नवी दिल्लीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

परस्पर लाभ, समानता या आधारावर नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मुद्यांवर तांत्रिक द्विपक्षीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार्यात्मक संस्थागत संबंधांचा पाया निर्माण करण्याचे उभय देशांचे उद्दिष्ट आहे. सहकार्याच्या क्षेत्रांशी संबंधित मुद्यांचा आढावा, देखरेख आणि चर्चा करण्यासाठी एक संयुक्त कृती समिती स्थापन करण्याची तरतूद या करारात आहे.

या करारामुळे दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत व्हायला मदत होईल.

 

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane



(Release ID: 1533167) Visitor Counter : 74


Read this release in: English