इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

माहिती तंत्रज्ञानविषयक स्थायी समिती 2017-18 ने माहितीची सुरक्षितता आणि गोपनियतेसंदर्भात जनतेची मते मागवली

Posted On: 18 MAY 2018 6:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मे 2018

 

लोकसभेतील खासदार अनुराग सिंग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील माहिती तंत्रज्ञानविषयक संसदीय स्थायी समिती 2017-18, नागरिकांच्या माहितीची सुरक्षा आणि गोपनियतेशी संबंधित बाबींच्या विविध पैलुंचे परिक्षण करीत आहे.

या विषयाचे महत्व लक्षात घेत, समितीने सर्वसामान्य नागरिक, तज्ञ, व्यावसायिक, संस्था, संघटना आणि इतर संबंधित भागिदारांच्या सूचना मागविल्या आहेत.

इच्छुकांनी आपल्या सूचनांच्या दोन प्रती (इंग्रजी किंवा हिंदी भाषेत) संचालक, (माहिती तंत्रज्ञान संबंधी समिती), लोकसभा सचिवालय, कक्ष क्र. जी -1, संसद भवन अनेक्स, नवी दिल्ली -110001 (दूरध्वनी क्र. 011- 23034388/5235) येथे सीलबंद पाकिटात, हे प्रसिद्धी पत्रक जारी झाल्यापासून दोन आठवड्यांच्या अवधीत पाठवायच्या आहेत. आपल्या सूचना comit@sansad.nic.in या ई मेल आयडी वर किंवा (Fax No. 011-23792726) या फॅक्स क्रमांकावरही पाठवता येतील.

पाठविलेल्या सूचना समितीसमोर सादर केल्या जातील, नोंदींच्या स्वरूपात समितीकडे राहतील तसेच त्याबाबत गोपनियता राखली जाईल. या नोंदी इतर कोणाहीसमोर उघड केल्या जाणार नाहीत आणि तसे करणे, हा समितीचा अनादर मानला जाईल.

समितीसमोर मौखिक सादरीकरण करू इच्छिणाऱ्यांनी लेखी निवेदन पाठविण्याबरोबरच विहित वेळेत लोकसभेला वरील पत्त्यावर तसे सूचित करावे, ही विनंती. मात्र याबाबत समितीचा निर्णय अंतिम असेल.

 

 

S.Tupe/M.Pange/D.Rane



(Release ID: 1532969) Visitor Counter : 82


Read this release in: English