मंत्रिमंडळ

खाण आणि भूविज्ञान क्षेत्रात भारत आणि मोरक्को यांच्यातल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 16 MAY 2018 6:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2018

 

खाण आणि भूविज्ञान क्षेत्रात भारत आणि मोरक्को यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराला, केंद्रीय मंत्रिमंडळाने पूर्वलक्षी प्रभावाने मंजुरी दिली आहे. मोरक्कोचे उर्जा, खाण आणि शाश्वत विकास मंत्रालय आणि भारताचे खाण मंत्रालय यांच्यात नवी दिल्लीत 11 एप्रिल 2018 ला या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या होत्या.

 या सामंजस्य करारामुळे खाण आणि भूविज्ञान क्षेत्रात भारत आणि मोरक्को यांच्यात संस्थात्मक यंत्रणा निर्माण होणार आहे. उभय देशांच्या आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रासाठी हे सहकार्य परस्परांना फायदेशीर ठरणार आहे.

खाण आणि भूविज्ञान क्षेत्रात भारत आणि मोरक्को यांच्यातले सहकार्य मजबूत करण्याचा या सामंजस्य कराराचा उद्देश आहे. भूविज्ञान पायाभूत सुविधांचा विकास, खाण आणि भूविज्ञानाला प्रोत्साहन, प्रशिक्षण कार्यक्रम आणि भूगर्भीय माहिती आणि आकडेवारी विषयक बँक यासारख्या क्षेत्रात हे सहकार्य करण्यात येणार आहे त्यामुळे कल्पकतेला चालना मिळणार आहे.

 

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane

 


(Release ID: 1532425) Visitor Counter : 110
Read this release in: English