मंत्रिमंडळ

भारत आणि ईक्विटोरियल गिनी यांच्यात वनौषधी क्षेत्रातल्या सहकार्याबाबत झालेल्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्री मंडळाची मान्यता

Posted On: 16 MAY 2018 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2018

 

भारत आणि ईक्विटोरियल गिनी यांच्यात वनौषधी क्षेत्रातल्या सहकार्याबाबत झालेल्या सामंजस्य कराराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत पूर्व लक्षी प्रभावाने  मान्यता देण्यात आली.

या सामंजस्य करारामुळे वनौषधी क्षेत्रात उभय देशातले सहकार्य वृद्धिगत होणार आहे.

संशोधन, प्रशिक्षण,परिषदा, बैठका आयोजित करण्यासाठी आवश्यक आर्थिक संसाधने, राष्ट्रीय वनौषधी मंडळ, आयुष मंत्रालयाच्या सध्याच्या मंजूर झालेल्या तरतुदीतून आणि आराखडा योजनेतून पुरवण्यात येणार आहेत. 

 

पूर्वपीठीका:

भारत हा जैव समृद्धी लाभलेल्या जगातल्या देशांपैकी एक देश आहे. 17000-18000 पुष्प वनस्पतीपैकी 7000 पेक्षा जास्त वनस्पतींचा आयुर्वेद, युनानी, सिध्द, होमिओपॅथी मधे औषधी उपयोग केला जातो. सुमारे 1178 वनौषधींचा व्यापार केला जात असून  242 वनौषधींचा वार्षिक उपयोग 100 मेट्रिक टनापेक्षा जास्त आहे.वनौषधी या पारंपरिक औषध आणि वनौषधी उद्योगाचा महत्वाचा भाग आहेत त्याचबरोबर भारतातल्या मोठ्या जन संख्येच्या उदरनिर्वाहाचेही साधन आहेत. जगभरात पारंपारिक आणि पर्यायी उपचार पद्धतीला मोठी पसंती लाभत असून सध्या 120 अब्ज अमेरिकी डॉलरवर असलेला वनौषधीचा हा व्यापार 2050 पर्यंत 7 ट्रीलीयन अमेरिकी डॉलरवर पोचेल अशी अपेक्षा आहे.

 

 

 

N.Sapre/N.Chitale/D.Rane



(Release ID: 1532423) Visitor Counter : 145


Read this release in: English