श्रम आणि रोजगार मंत्रालय

ईपीएफओची ‘पेन्शन पासबुक बघा’ सुविधा ज्येष्ठ नागरिकांना उमंग ॲपवर बघता येणार पासबुक

Posted On: 03 MAY 2018 3:36PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 मे 2018

 

ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेनं सर्व निवृत्ती वेतनधारकांसाठी उमंग ॲपच्या माध्यमातून नवी सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोबाईलवरच्या उमंग ॲपवर जाऊन ‘व्ह्यू पासबुक’ हा पर्याय निवडता येईल. गरज पडल्यास त्यांना पीपीओ क्रमांक आणि जन्मतारीख विचारली जाईल. या माहितीची सत्यता तपासण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या मोबाईलवर ओटीपी म्हणजेच वन टाईम पासवर्ड येईल. हा ओटीपी टाकल्यावर ज्येष्ठ नागरिक या ॲपवरच आपले पासबुक बघू शकतील. या सुविधामुळे ज्येष्ठ नागरिकांना घरच्या घरी आपली पेन्शन जमा झाली की नाही हे कळू शकेल. तसेच, पासबुक डाऊनलोडही करता येईल.

‘उमंग’ ॲपवर निवृत्तीवेतन धारकांसाठी इतर अनेक सुविधाही उपलब्ध आहेत.

 

N.Sapre/R.Aghor/P.Kor


(Release ID: 1531183) Visitor Counter : 192
Read this release in: English