मंत्रिमंडळ

भारतीय पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा सेवेच्या (आयपीएस) नावावर पेट्रोलियम आणि सुरक्षा संघटनेच्या (पीईएसओ) तांत्रिक कॅडरच्या गट ‘अ’ सेवेच्या समीक्षा आणि निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 02 MAY 2018 5:37PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 मे 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा सेवेच्या (आयपीएस) नावावर पेट्रोलियम आणि सुरक्षा संघटनेच्या (पीईएसओ) तांत्रिक कॅडरच्या गट ‘अ’ सेवेच्या समीक्षा आणि निर्मितीला मंजुरी दिली आहे.

ह्या उपाययोजनांमुळे संस्थेच्या क्षमता आणि कार्यक्षमतेत वाढ होईल आणि संस्थेच्या 'अ' दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या प्रगतीत सुधारणा होईल.

पार्श्वभूमी:

पीईएसओ हे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागा (डीआयपीपी) अंतर्गत एक कार्यालय आहे. ही संस्था 1898 पासून विस्फोटके, कॉम्प्रेस वायू आणि पेट्रोलियमसारख्या पदार्थांच्या सुरक्षेचे नियमन करण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, पीईएसओची भूमिका आणि जबाबदाऱ्‍यांमध्ये वाढ झाली असून विविध क्षेत्रात तिचा विस्तार देखील झाला आहे.

 

N.Sapre/S.Mhatre/P.Kor

 



(Release ID: 1531012) Visitor Counter : 98


Read this release in: English