मंत्रिमंडळ
आरोग्य सुविधांना चालना
2019-20 पर्यंत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
02 MAY 2018 5:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 मे 2018
देशात आरोग्यसेवा क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विस्तारास प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 2019-20 पर्यंत प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे. यासाठी 14,832 कोटी रुपयांचा आर्थिक खर्च होणार आहे. या योजनेअंतर्गत, नवीन एम्स रुग्णालयांची स्थापन करण्यात आली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अद्ययावतीकरण करण्यात आले आहे.
उद्दीष्टे:
पीएमएसएसवाय ही एक केंद्रशासित क्षेत्र योजना आहे. देशातील सर्वसाधारण भागातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून संतुलन साधने आणि ज्या राज्यांमध्ये सुविधांची कमतरता आहे तिथे गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणाची सुविधा वाढविणे आहे हे उद्दिष्टे आहे.
प्रभाव:
नव्या एम्सची स्थापना झाली तर केवळ आरोग्य शिक्षण आणि प्रशिक्षणातच बदल होणार नाही तर या क्षेत्रातील आरोग्यसेवा व्यावसायिकांच्या कमतरतेच प्रश्न देखील सुटेल. नवीन एम्सच्या बांधकामासाठी केंद्र सरकार 100 टक्के आर्थिक सहाय्य करणार आहे. नवीन एम्स रुग्णालयांच्या कार्यान्वय आणि देखरेखीचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे.
सुपर स्पेशालिटी ब्लॉक्स/ट्रामा केंद्र आदीच्या माध्यमातून आरोग्य पायाभूतसुविधांचे अद्ययावतीकरण करणे तसेच सध्या सुरु असलेल्या आणि नवीन सुविधांचा खर्च राज्य आणि केंद्र सरकार भागीदारीत करतील.
रोजगार निर्मिती:
विविध राज्यांमध्ये नवीन एम्स रुग्णालयांची स्थापन केल्यामुळे प्रत्येक रुग्णालयात विविध पदांसाठी सुमारे 3 हजार रोजगार निर्माण होतील. याशिवाय, नवीन एम्स रुग्णालयांच्या परिसरात होणाऱ्या शॉपिंग सेंटर, कॅन्टीन्स इत्यादी सुविधा आणि सेवांमुळे अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल.
N.Sapre/S.Mhatre/P.Kor
(Release ID: 1531010)
Visitor Counter : 160