रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
नितीन गडकरी यांनी रस्ते मंत्रालयासमोर ठेवले लक्ष्य
Posted On:
17 APR 2018 2:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2018
2018-19 या चालू आर्थिक वर्षात 20 हजार किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांच्या विविध कार्यांसाठी कंत्राट देण्याचे लक्ष्य रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयासमोर ठेवले आहे. 2017-18 या चालू आर्थिक वर्षात देण्यात आलेल्या 17,055 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांसाठी देण्यात आलेल्या कामांच्या तुलनेत ते 25 टक्क्यांनी अधिक आहे.
चालू आर्थिक वर्ष 2018-19 साठी 16,420 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षासाठी प्रति दिन 45 किलोमीटर बांधणीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ते जवळपास 27 किलोमीटर होते.
गडकरी यांनी आज आपल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात योजनांची राज्यवार स्थितीची समीक्षा करण्यात आली.
N.S/S.K/P.M
(Release ID: 1529469)