शिक्षण मंत्रालय
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या “स्टडी इन इंडिया” पोर्टलचे उद्या अनावरण
Posted On:
17 APR 2018 12:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 एप्रिल 2018
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या “स्टडी इन इंडिया” पोर्टलचे (www.studyinindia.gov.in) उद्या मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांना नॅक आणि एनआयआरएफ मानांकन असलेल्या निवडक 150 भारतीय संस्थामधल्या विविध अभ्यासक्रमांसाठी अर्ज करता येणार आहे.
N.S/S.K/P.M
(Release ID: 1529454)
अभ्यागत कक्ष : 107