पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या दिल्लीत अलीपूर मार्ग येथे डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्‌घाटन करणार

प्रविष्टि तिथि: 12 APR 2018 8:56PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2018

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 13 एप्रिल रोजी नवी दिल्लीत 26, अलीपूर मार्ग येथे डॉ. आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्‌घाटन करणार आहेत.

6 डिसेंबर 1956 रोजी याच भवनात डॉ. आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले होते.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी, डिसेंबर 2003 मध्ये 26, अलीपूर मार्ग येथील डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण स्थळ राष्ट्राला समर्पित केले होते.

21 मार्च 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाचे भूमिपूजन केले होते.

घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मारक पुस्तकाच्या आकारात बांधण्यात आले आहे.

या सारकामध्ये एक संग्रहालय देखील आहे, जिथे मल्टिमीडिया तंत्रज्ञान, दृक श्राव्य माध्यम, डायनामीक मीडिया आणि स्टॅटिक मीडियाच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांचा जीवनप्रवास आणि भारतातली त्यांचे योगदान दाखवले आहे.

येथे ध्यानकेंद्र देखील उभारण्यात आले आहे. तोरण द्वार, बोधी वृक्ष, संगीताच्या तालावरील कारंजे ही आणखी काही वैशिष्ट्ये आहेत.

 

BG/SM/PK


(रिलीज़ आईडी: 1528944) आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English