पंतप्रधान कार्यालय

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांच्या यशोगाथा पंतप्रधानांना सांगितल्या

Posted On: 11 APR 2018 1:34PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2018

 

प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या देशभरातील अंदाजे 100 लाभार्थ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी त्यांच्यासोबत संवाद साधला.

पंतप्रधानांसोबतच्या अनौपचारिक संवादादरम्यान अनेक लाभार्थ्यांनी सांगितले की, मुद्रा कर्जामुळे त्यांच्या आयुष्यात अशा प्रकारे सुधारणा झाल्या आहेत.

झारखंडमधील बोकारो येथील किरण कुमारी या लाभार्थ्याला 2 लाख रुपयांचे कर्ज मिळाल्यानंतर तिने कशाप्रकारे स्वत:चे खेळण्याचे आणि भेट वस्तूंचे दुकान सुरू केले हे सांगितले. याआधी ती आणि तिचा नवरा त्यांच्या उपजिविकेसाठी दारोदारी जाऊन खेळणी विकायचे. कर्ज मिळाल्यानंतर तिला एका यशस्वी उद्योजिकेची ओळख मिळाली आहे.

सुरतमधील मुनीराबानू शब्बीर हुसैन मलेक हिला 1.77 लाख रुपयांचे कर्ज मिळाले. तिने सांगितले की कर्ज मिळाल्यानंतर तिने कशाप्रकारे छोटे वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि आता ऑटो रिक्षा चालवून महिना 25,000 रुपये कमवत आहे.

केरळातल्या कन्नूरमधील सीजेश पी. गेल्या वर्षापासून परदेशात काम करत होते. भारतात परत आल्यानंतर एका औषध कंपनीत ते विक्री व्यवस्थापक म्हणून काम करत होते. त्यांनी पंतप्रधानांना उत्साहाने सांगितले की, 8.55 लाख रुपयांचे मुद्रा कर्ज मिळाल्यानंतर त्यांनी हर्बल दंत मंजन तयार करण्याचा एक छोटा कारखाना सुरू केला. त्यांनी पंतप्रधानांना त्यांच्या उत्पादनाचे काही नमुने दिले.

तेलंगणाच्या सलेहुनदूम गिरीधर राव यांनी पंतप्रधानांना त्यांच्या उद्योजकतेची गाथा सांगितली. त्यांना 9.10 लाख रुपयांचे मुद्रा कर्ज मिळाले, जे त्यांनी त्यांच्या डायकास्टींग आणि मोल्डींग व्यवसायात अधिक प्रगतीसाठी वापरले.

जम्मू-काश्मीरमधल्या कठुआ जिल्ह्यातल्या विणा देवी विणकर म्हणून काम करतात. त्यांना 1 लाख रुपयांचे मुद्रा कर्ज मिळाले. आता त्या पश्मिना शाल बनवणाऱ्या त्यांच्या भागातील एक मुख्य उत्पादक झाल्या आहेत. पंतप्रधानांसोबतच्या संवादावेळी त्यांनी पंतप्रधानांना एक पश्मिना शाल भेट दिली.

डेहराडूनमधील राजेंद्र सिंह हे लष्करातील एक निवृत्त जवान आहेत.  त्यांना मिळालेल्या 5 लाख रुपयांच्या मुद्रा कर्जातून त्यांनी झाडू तयार करण्याचा आणि किरकोळ विक्रेत्यांना ते पुरवण्याचा व्यवसाय कशा प्रकारे सुरू केला याची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. ते स्वत: एक यशस्वी उद्योजक तर झालेच पण सोबतच त्यांनी काही लोकांना रोजगार देखील दिला.

चेन्नईतल्या टी. आर. संजीवन यांना 10 लाख रुपयांचे मुद्रा कर्ज मिळाले. आता ते कशाप्रकारे एका फाऊंडरीसाठी काम करत आहेत.

जम्मूमधील सतीश कुमारला 5 लाख रुपयांचे कर्ज मिळाले होते. तो आधी बेरोजगार होता. आता त्याचा पोलाद वस्तू निर्मिती आणि व्यापाराचा व्यवसाय आहे. त्यांनी त्याचा अनुभव पंतप्रधानांना सांगितला.

उत्तराखंडमधील उधमसिंह नगर येथील विप्लव सिंह हे एका औषध कंपनीत काम करत होते. परंतु आपला स्वत:चा व्यवसाय असावा अशी त्यांची इच्छा होती. 5 लाख रुपयांचे मुद्रा कर्ज मिळाल्यानंतर त्यांनी किटकनाशके आणि खतांच्या व्यापाराचा व्यवसाय सुरू केला आणि आता त्यांनी या व्यवसायात काही लोकांना रोजगार देखील दिला आहे. त्यांनी त्यांचे अनुभव पंतप्रधानांना सांगितले.

अजून काही लाभार्थ्यांनी देखील त्यांचे अनुभव पंतप्रधानांना सांगितले.

ज्या उद्योजकांनी मुद्रा कर्जाचा चांगला उपयोग केला आहे त्यांचे पंतप्रधानांनी कौतुक केले. आतापर्यंत 11 कोटी लोकांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ मिळाला आहे. लोकांचा आत्मविश्वास वाढावा हा देखील या योजनेचा एक हेतु आहे. सार्वजनिक क्षेत्रात नाही तर खासगी क्षेत्रातच रोजगार मिळू शकतो अशी विचारसरणी आपल्या येथे रूढ होती. उपजिविका आणि स्वयं-रोजगारांचे साधन म्हणून देखील ‘वैयक्तिक क्षेत्राचा’ विकास होत आहे.

पंतप्रधान आणि लाभार्थ्यांमधील हा अनौपचारिक संवाद एक तासाहून अधिक वेळ सुरू होता. यावेळी अर्थ राज्यमंत्री पी. राधाकृष्णन आणि शिव प्रताव शुक्ला देखील उपस्थित होते.

 

BG/SM/PK

 


(Release ID: 1528771) Visitor Counter : 106


Read this release in: English