वस्त्रोद्योग मंत्रालय

स्वच्छता ही ‘जन चळवळ’ बनवण्याचा वस्त्रोद्योग मंत्रालयाचा प्रयत्न

प्रविष्टि तिथि: 11 APR 2018 5:14PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2018

 

मुंबईतल्या वस्त्रोद्योग समितीने प्रभादेवी इथल्या समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवून 10 टन कचरा स्वच्छ केला. 1 ते 15 मार्च 2018 या स्वच्छता पंधरवड्यात राबवल्या गेलेल्या या मोहिमेत स्थानिक नागरिकही सहभागी झाले होते.

याशिवाय, मंत्रालयाने या पंधरवड्यात विविध उपक्रम राबवले. या अंतर्गत मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी विविध कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांना स्वच्छतेसाठी प्रेरणा दिल्या.

तसेच विविध शहरांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी कार्यशाळा, स्पर्धा मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय टामटा यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.

 

NS/RA/PK

 


(रिलीज़ आईडी: 1528660) आगंतुक पटल : 125
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English