पंतप्रधान कार्यालय

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 08 APR 2018 6:54PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 8 एप्रिल 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. भारत्तोलकांचे अभिनंदन करताना, सुवर्णपदक विजेत्या रगाला वेंकट राहुल याचा अभिमान आहे. आपल्या भारत्तोलकांच्या चमकदार कामगिरीमुळे, भारत्तोलन क्षेत्राकडे येण्यासाठी अधिकाधिक युवकांना प्रेरणा मिळेल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

 69 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावणाऱ्या महिला भारत्तोलक, पूनम यादवचे अभिनंदन. भारत्तोलनाप्रती तिची निष्ठा वाखाणण्याजोगी असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

नेमबाजांचे अभिनंदन, मनू भाकेरनं चमकदार कामगिरी सुरूच ठेवत, महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. तिचे अभिनंदन.

महिलांच्या 10 मीटर एयर पिस्तूल प्रकारात रजत पदक मिळवणाऱ्या हीना सिद्दूची कामगिरी प्रभावदार आहे, तिचे अभिनंदन करतानाच भविष्यातील कामगिरीसाठी, पंतप्रधानांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.

पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात नेमबाज रवी कुमार याने कांस्य पदक पटकावले असून त्याच्या कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. या युवा नेमबाजाने क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान दिल्याचे पंतप्रधान म्हणाले.

 

NS/NC/PK


(Release ID: 1528311) Visitor Counter : 124


Read this release in: English