मंत्रिमंडळ

भारतीय स्पर्धा आयोगाची सदस्यसंख्या कमी करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 04 APR 2018 10:11PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2018

 

भारतीय स्पर्धा आयोगाची सदस्यसंख्या कमी करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सध्या या आयोगात एक अध्यक्ष आणि सहा सदस्य असे सात जण आहे. ही संख्या एक अध्यक्ष आणि तीन सदस्यांपर्यंत कमी करण्याच्या प्रस्तावाला पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.  त्यामुळे या आयोगाने सध्या रिक्त असलेली दोन पदे भरली जाणार नाहीत.

केंद्र सरकारच्या किमान सरकार-कमाल प्रशासन या उद्दिष्टानुसार घेतलेल्या या निर्णयामुळे तीन पदे कमी होणार आहेत.

एकाच प्रकारची कामे करणाऱ्या विविध संस्थांचे विलिनीकरण किंवा समन्वय करून प्रशासनात कार्यक्षमता आणि सुलभता वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यासाठीच 2017 मध्ये सरकारने ‘किमान’ पातळीच्या निकषांत सुधारणा करून ते व्यक्ती, मालमत्ता आणि इतर कामांचा समावेश केला. यामुळे विविध संस्थांनी आयोगाला सादर करण्याच्या माहितीचे प्रमाण कमी झाले, पर्यायाने आयोगावरील अतिरिक्त भारही कमी झाला.

या निर्णयामुळे आयोगाची सुनावणी घेण्याची, निकाल आणि मंजुरी देण्याची क्षमता वाढेल आणि मंजुरी लवकर मिळाल्यामुळे व्यवसाय तसेच रोजगारात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

 

NS/RA/PK


(Release ID: 1527831) Visitor Counter : 187


Read this release in: English