मंत्रिमंडळ

बर्न स्टॅंडर्ड लिमिटेड कंपनी बंद करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 04 APR 2018 8:37PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 4 एप्रिल 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय सार्वजनिक कंपनी बर्न स्टँडर्ड कंपनी लिमिटेड बंद करण्याला मंजुरी दिली आहे.सरकारकडून आर्थिक मदत आणि इतर पाठबळ मिळून देखील मागील 10 वर्षे कंपनी सतत खराब आर्थिक कामगिरी करत असल्याने आणि भविष्यात कंपनीच्या पुनरुज्जीवनाची शक्यता खूपच कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपायामुळे सार्वजनिक निधीत बचत होईल, ज्याचा वापर सध्या बीएससीएलचे नुकसान भरून काढण्यासाठी  केला जात आहे आणि तो इतर विकास कामासाठी वापरला जाऊ शकतो.

कंपनीची सध्याची कर्ज फेडण्यासाठी आणि बरखास्तीकरण पॅकेजसाठी सरकार एकदाच 417.10 कोटी रुपयांचे अनुदान देणार आहे. याव्यतिरिक्त भारत सरकारने कंपनीला दिलेले 35 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाईल. बीएससीएलचे 508 कर्मचाऱ्यांना  स्वेच्छा सेवानिवृत्ती योजनेचा लाभ मिळेल.

 

NS/SM/PK



(Release ID: 1527811) Visitor Counter : 75


Read this release in: English