पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ई-कचऱ्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी इंडिया टुरिझम मुंबई आणि  क्रोमा स्टोअर्स आले एकत्र

अतुल्य भारत आणि क्रोमा ब्रँडेड "ई-कचरा संकलन बॉक्स" महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 50 हून अधिक क्रोमा स्टोअर्समध्ये ठेवण्यात येणार

Posted On: 24 SEP 2022 9:16PM by PIB Mumbai

 

ई-कचऱ्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी इंडिया टुरिझम मुंबईने  टाटा उद्योगाच्या  क्रोमा स्टोअर्स सोबत सहकार्य केले आहे. ई-कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने उचललेले हे एक पाऊल आहे. यासाठी इंडिया टुरिझम मुंबई महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील 50 हून अधिक क्रोमा स्टोअर्समध्ये "नेहमीप्रमाणे भारताला अतुलनीय ठेवण्यासाठी मदत करा" या बोधवाक्यासह खास डिझाईन केलेले अतुल्य भारत आणि क्रोमा ब्रँडेड "ई-कचरा संकलन बॉक्स" ठेवणार आहे.  आज मुंबईतील  जुहू येथील क्रोमा स्टोअरमध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

इंडिया टुरिझम मुंबई आणि  क्रोमा स्टोअर्स ई-कचरा  व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करतील. उत्तम प्रकारे जगता यावे यासाठी ग्राहक अत्याधुनिक उत्पादनांकडे वळत असताना, इंडिया टुरिझम आणि क्रोमा यांनी 'जबाबदारीने वापर ' ही  संस्कृती रुजवण्याचे ध्येय ठेवले आहे.  हा एक वर्षभर चालणारा उपक्रम असून त्याचा उद्देश जागरूकता निर्माण करणे आणि ग्राहकांना ई-कचरा  जबाबदारीने जमा करण्याबाबत  प्रोत्साहित करणे हा आहे.

यावेळी जुहू येथील क्रोमा स्टोअरमध्ये इंडिया टुरिझम मुंबईचे प्रादेशिक संचालक डी वेंकटेशन  उपस्थित होते.

ई-कचऱ्याबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक कचरा नष्ट करताना सामोरे जावे लागणाऱ्या आव्हानांचा विचार करून प्रथमच हा  नाविन्यपूर्ण उपक्रम  हाती घेण्यात आला आहे.

आज,उपकरणे अपग्रेड करण्याकडे आणि  नवीन उपकरणे खरेदी करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे  लोक दरवर्षी नवीन आणि अद्ययावत उपकरणे विकत घेतात आणि जुनी टाकून देतात. मात्र या उरलेल्या आणि न वापरलेल्या उपकरणांचे करायचे काय असा प्रश्न निर्माण होतो  या समस्येचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी, इंडिया टुरिझम मुंबई आणि क्रोमा यांनी आपल्या ग्राहकांसाठी सुरक्षितरित्या  आणि पर्यावरणाला अनुकूल पद्धतीने जुन्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विल्हेवाट लावण्यासाठी जस्टडिस्पोज या  ई-कचऱ्याची  विल्हेवाट लावण्यात  तज्ञ असलेल्या कंपनीबरोबर भागीदारी केली  आहे. या बदल्यात क्रोमा जी व्यक्ती ई-कचरा विल्हेवाट लावण्यासाठी देतेत्यांच्या नावावर एक झाड लावते. हे अतुल्य भारत ई-कचरा संकलन बॉक्स देशभरातील क्रोमा स्टोअर्समध्ये एक वर्षासाठी ठेवले जातील.

केंद्रीय पर्यटन मंत्रालय 16 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत स्वच्छता पखवाडा म्हणजेच स्वच्छता पंधरवडा पाळत आहे. स्वच्छता पखवाडाचा एक भाग म्हणून , पश्चिम आणि मध्य प्रदेशासाठी पर्यटन मंत्रालयाचे  प्रादेशिक कार्यालय असलेल्या इंडिया टुरिझम मुंबईने टाटा समूहातील प्रतिष्ठित क्रोमा या इलेक्ट्रॉनिक्स  वस्तूंच्या विकेत्याबरोबर  सहकार्य केले आहे.

***

N.Chitale/S.Kane/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1862000) Visitor Counter : 157


Read this release in: English