Print
XClose
Press Information Bureau
Government of India
आयुष मंत्रालय
10 OCT 2023 2:50PM by PIB Mumbai
आयुर्वेद शास्त्र  पर्यावरणाची जोपासना करत  प्राणी, वनस्पती तसेच मानवी जीवनाला देते लाभ : सर्बानंद सोनोवाल

 

केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांनी आज, ‘मीडिया सेंटर’  येथे पत्रकार परिषदेत 8 व्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त  महिनाभर चालणा-या आयुर्वेद  उत्सव मोहिमेचे अनावरण केले. आठवा आयुर्वेद दिन देशभर साजरा केला जाणार आहे. आपल्या संस्कृतीमध्ये दिवाळीमध्‍ये धनत्रयोदशीला भगवान धन्वंतरींची पूजा करून  आपल्या  आणि इतरांच्या आरोग्यासाठी या देवतेचे  आशीर्वाद घेतले जातात.

पत्रकारांबरोबर संवाद  साधताना केंद्रीय मंत्र्यांनी आयुर्वेदाच्या जन आरोग्य पैलूसाठी जन संदेश, जन भागीधारी आणि जनचळवळीवर भर दिला. ते म्हणाले, “ आठव्या आयुर्वेद दिनानिमित्त फक्त माणसांसाठीच  नाही तर लोकांच्या कल्याणाबरोबरच पर्यावरण, वनस्पती प्राणी यांच्याही सहअस्तित्वाला चालना देण्यासाठी आयुर्वेदाची क्षमता शोधण्याचा आयुष मंत्रालयाचा मानस आहे. त्यामुळे यावर्षी "एक आरोग्यासाठी आयुर्वेद" ही संकल्पना  निश्चित केली  आहे.

ही संकल्पना भारताच्या जी -20 अध्‍यक्षपदाच्या 'वसुधैव कुटुंबकम' या संकल्पनेशी सुसंगत आहे यावेळी  'दररोज प्रत्येकासाठी आयुर्वेद' असे  घोषवाक्य   निश्चित करण्यात आले  आहे. हिंदीमध्‍ये ही टॅग लाईन हर दिन हर किसी के लिए आयुर्वेदअशी निश्चित केली आहे. मानव-प्राणी-वनस्पती-पर्यावरण  यांना जोडण्यावर  लक्ष केंद्रित केले आहे; .

मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांनी महिनाभर चालणाऱ्या आयुर्वेद उत्सवाविषयी विस्तारपूर्वक माहिती देवून  सरकारच्या दृष्‍टीकोनाविषयी  सांगितले तसेच या उत्सवासाठी  आतापर्यंत केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला."

विद्यार्थी, शेतकरी आणि जनतेला आयुर्वेदाबद्दल जागरुक करण्यासाठी संपूर्ण भारतभर हा  महिना साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या वर्षी 8 वा आयुर्वेद दिवस 10 नोव्हेंबर 2023 रोजी येणार आहे. आयुष मंत्रालयाने आयुर्वेदाद्वारे आरोग्याच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी दरवर्षी आयुर्वेद दिनासाठी वेगवेगळ्या संकल्पना  निवडल्य जातात.  निवडलेल्या संकल्पनेवर विविध कार्यक्रम देशभरात आयोजित केले जातात, त्यामध्‍ये लाखो लोक सहभागी होतात.  यामुळे आरोग्याच्या समस्येबद्दल तसेच या समस्येच्या प्रतिबंध आणि उपचारांमध्ये आयुर्वेदाच्या संभाव्य भूमिकेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यास मदत होते.

संकल्पना  तीन मुख्य क्षेत्रांवर केंद्रित आहे: शेतकऱ्यांसाठी आयुर्वेद, विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद आणि लोकांसाठी आयुर्वेद.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी माहिती दिली की, एनएएम म्हणजेच राष्‍ट्रीय आयुर्वेद मिशन  अंतर्गत एकूण 12,500 आयुष आरोग्य आणि निरामय  केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे, त्यापैकी 8095 आधीच कार्यरत आहेत. महिनाभर चालणाऱ्या आयुर्वेद मोहिमेमध्‍ये पुढील  गोष्‍टींचा  समावेश असणार आहे . यामध्ये  आयुर्वेद संस्थांमध्ये प्रदर्शन; संशोधन अभ्यासाच्या परिणामांचा प्रसार; वैद्यकीय शिबिरे; शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जनजागृतीपर व्याख्याने; शेतकऱ्यांना सामान्य औषधी वनस्पतींचे वितरण; आयुर्वेद सामान्य लोकांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी विविध स्पर्धा; रन फॉर आयुर्वेद आणि द रायडर्स रॅली,यासह  इतर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात येणार आहे.

***

N.Chitale/S.Bedekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com  /PIBMumbai    /pibmumbai