नवी दिल्ली, 28 फेब्रुवारी 2019
भारत-जपान दरम्यान द्विपक्षीय देवाण घेवाण करार अर्थात बीएसए झाला असून, भारताला 75 अब्ज अमेरीकी डॉलर्स उपलब्ध होणार आहेत.
रिझर्व्ह बँक आणि बँक ऑफ जपान यांनी भारत-जपान दरम्यानच्या द्विपक्षीय देवाण-घेवाण करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. बीएसएला केंद्रीय मंत्रिमंडळाने 10 जानेवारी 2019 रोजी मान्यता दिली होती. हा करार आजपासून अंमलात येत आहे.
भारत सरकारने या कराराचे स्वागत केले असून, दोन्ही देशांदरम्यानचे आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील, असे म्हटले आहे.
N.Sapre/J.Patankar/D. Rane