नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2018
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी आज रवाना झाले. या दौऱ्यादरम्यान ते शिकागो येथे आयोजित दुसऱ्या विश्व हिंदू परिषदेला संबोधित करणार आहेत. 1893 साली विश्व हिंदू परिषदेच्या मंचावरुन स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाषणाला 125 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
8 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती शिकागोमध्ये दाखल होणार असून अमेरिकेतल्या 14 तेलगु संघटनांतर्फे आयोजित कार्यक्रमात ते सहभागी होतील. या कार्यक्रमाला अमेरिकेच्या विविध भागांमध्ये वास्तव्य करणारे अनिवासी भारतीयही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती विश्व हिंदू परिषदेला संबोधित करणार असून त्याच दिवशी संध्याकाळी ते भारतीय समुदायातर्फे आयोजित समारंभालाही संबोधित करतील.
11 सप्टेंबर रोजी ते मायदेशी परततील.
B.Gokhale/M.Pange/P.Kor