Print
XClose
Press Information Bureau
Government of India
उपराष्ट्रपती कार्यालय
22 FEB 2018 6:06PM by PIB Mumbai
हायस्कूलपर्यंत मातृभाषा हा अनिवार्य विषय करावा उपराष्ट्रपतींचे राज्यसरकारांना आवाहन

नवी दिल्ली  22 फेब्रुवारी  2018

 

सर्व राज्य सरकारांनी किमान हायस्कूलपर्यंत मातृभाषा हा विषय अनिवार्य करावा असे आवाहन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केले आहे. ते आज चेन्नई येथे सविता इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल अँण्ड टेक्निकल सायन्सच्या 11 व्या पदवीदान समारंभात बोलत होते. लहान मुले एखादी गोष्ट इतर कोणत्याही भाषेपेक्षा आपल्या मातृभाषेतच उत्तम रितीने समजू शकतात आणि ग्रहण करु शकतात. आपल्या मातृभाषेतच मुले उत्तम रितीने संवाद साधू शकतात आणि आपले विचार मांडू शकतात. आपणही आपले विचार आपल्या मातृभाषेतच उत्तम रितीने मांडू शकतो असे ते म्हणाले.

वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांसह सर्वच विद्यार्थ्यांसाठी महान नेत्यांचे जीवन हा इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा भाग असला पाहिजे असे सांगून ज्या देशाला आपल्या इतिहास आणि संस्कृतीचा विसर पडला त्या देशाची कधीच भरभराट होऊ शकत नाही. इतिहास स्मरणात ठेऊन आपण भविष्याची आखणी केली पाहिजे असे ते म्हणाले.

आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी खाजगी क्षेत्राने मोठी भूमिका बजावली पाहिजे. समाजाने वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी बरेच केले असून, ग्रामीण भागात किमान दोन वर्ष तरी ग्रामीण जनतेची सेवा करुन त्यांनी समाजाचे ऋण फेडावे असे आवाहन त्यांनी केले.

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar