संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुण्याच्या आकाशात थराराची अनुभूती: लोहगाव येथे भारतीय वायुसेनेच्या हवाई प्रात्यक्षिकांनी 19,000 हून अधिक प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध

Posted On: 27 NOV 2026 7:52PM by PIB Mumbai

पुणे, 27 नोव्हेंबर 2026

पुण्यातील लोहगाव एअर फोर्स स्टेशनवर 'नो युअर फोर्सेस' मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेने आज  भव्य हवाई प्रात्यक्षिक सादर करून आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवले. हा कार्यक्रम 19,000 हून अधिक प्रेक्षकांनी  प्रामुख्याने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी होते.

'आकाश गंगा' पथकाच्या अचूक स्कायडायव्हिंग प्रात्यक्षिकांनी, Su-30 MKI विमानाच्या कमी उंचीवरील चित्तथरारक हवाई कसरतींनी, चेतक हेलिकॉप्टरच्या फ्लायपास्टने तसेच 'सूर्यकिरण' आणि 'सारंग' या हवाई प्रात्यक्षिक पथकांच्या नेत्रदीपक फॉर्मेशन फ्लाइंगने उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली. प्रत्येक प्रात्यक्षिकाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या कार्यक्रमाचा उद्देश भारतीय हवाई दलाची क्षमता दाखवणे आणि तरुणांना भारतीय वायुसेनेत सामील होण्यासाठी प्रेरित करणे हा होता.

विमानांचे आणि विविध लष्करी उपकरणांचे स्थिर प्रदर्शनही यावेळी आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनादरम्यान वायुसेनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तरुणांशी संवाद साधला 

एअर कमोडोर सतबीर सिंग राय, व्हीएम, एअर ऑफिसर कमांडिंग, एअर फोर्स स्टेशन लोहेगाव यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिलेल्या मनःपूर्वक पाठिंब्याबद्दल नागरी प्रशासनाचे आभार मानले  आणि कौतुक केले.


पीआयबी मुंबई |सुवर्णा बेडेकर/भक्‍ती सोनटक्‍के/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2342780) अभ्यागत कक्ष : 22
Read this releasein: English