दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दूरसंवाद सेवा आणि सायबर सुरक्षा याविषयी दूरसंवाद विभागाची मुंबई आणि महाराष्ट्रातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा

Posted On: 27 NOV 2026 6:08PM by PIB Mumbai

मुंबई, 27 नोव्हेंबर 2026

संपर्क मंत्रालयाच्या दूरसंवाद विभागाने, आपल्या मुंबई परवाना सेवा क्षेत्राच्या (मुंबई एलएसए) माध्यमातून देशव्यापी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा स्पर्धेची घोषणा केली आहे. दूरसंवाद सेवा व सायबर सुरक्षा याबाबतच्या जागरुकतेसाठी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी डिसेंबर महिन्यात ही स्पर्धा होणार आहे.

सर्व प्रकारच्या शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होता यावे अशा दृष्टीने स्पर्धेचे नियोजन करण्यात आले असून सरकारी, खाजगी शाळा, केंद्रिय विद्यालय (केव्ही), सीबीएसइ आणि इतर संलग्न शाळांमधील विद्यार्थी स्पर्धेत भाग घेऊ शकतात. आपल्या क्षेत्रिय कार्यालयांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांच्या मुख्यालयांकडून प्रत्येक एलएसएमधील किमान 300 शाळा आणि सहभागी शाळांमधील प्रत्येकी किमान 50 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी व्हावेत असे दूरसंवाद विभागाचे उद्दीष्ट आहे. प्रतिष्ठित राष्ट्रीय मान्यता व व्यापक डिजिटल सुलभता यासाठी ही स्पर्धा शाळा, राज्य, विभागीय व राष्ट्रीय स्तरावर दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणार आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने होईल. याची सुरुवात सहभागी शाळांमध्ये एलएसए आणि अधिकृत पोर्टलच्या माध्यमातून माहिती देण्याने होईल आणि त्यानंतर शिक्षकांच्या आयडीद्वारे विद्यार्थ्यांची नांवनोंदणी केली जाईल. विद्यार्थी पहिल्यांदा वैयक्तिकरित्या पहिल्या स्तरावरील ऑनलाइन प्रश्नमंजूषेत भाग घेतील यातून प्रत्येक शाळेतील पहिल्या दोन विद्यार्थ्यांची निवड शाळेच्या अधिकृत संघासाठी केली जाईल. हे संघ दुसऱ्या फेरीमध्ये आपल्या शाळेच्या युजर आयडीद्वारे स्पर्धेत सहभागी होतील आणि यातून राज्य स्तरावरील गुणानुक्रम ठरविला जाईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये नवी दिल्लीत प्रत्यक्ष स्वरुपात स्पर्धा होईल. यामध्ये प्रत्येक विभागातील सहा राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील राज्य पातळीवरचे विजेते संघ विभागीय पातळीवरील स्पर्धेत सहभागी होतील. यातून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांच्या दिल्ली येथे होणाऱ्या भव्य राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीचे प्रसारण राष्ट्रीय वाहिनीवरुन केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे यासाठी संस्थात्मक सर्वोत्कृष्टतेला पुरस्कृत करण्यासाठी डीओटीने स्पर्धेच्या प्रत्येक स्तरावरील पुरस्कारांची व रोख बक्षीसांची रचनात्मक विभागणी केली आहे. शालेय स्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण व रौप्य पदक दिले जाणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. राज्य स्तरावरील विजेत्या संघांना प्रत्येकी ₹25,000 तर विभागीय स्तरावरील विजेत्या संघांना प्रत्येकी ₹50,000 पारितोषिक म्हणून दिले जातील. राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीत विजेत्या ठरलेल्या संघाला ₹3 लाखांचे रोख बक्षीस आणि विजेता करंडक दिला जाईल. पहिल्या क्रमांकाच्या उपविजेत्या व दुसऱ्या क्रमांकाच्या उपविजेत्याला अनुक्रमे ₹2 लाख व ₹1 लाखाचे पारितोषिक देण्यात येईल.    

पीआयबी मुंबई |सुवर्णा बेडेकर/सुरेखा जोशी/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2342720) अभ्यागत कक्ष : 24
Read this releasein: English