Posted On:
26 NOV 2026 7:48PM by PIB Mumbai
मुंबई, 26 नोव्हेंबर 2026
भारतीय संविधानाच्या स्वीकृतीच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने , महाराष्ट्र आणि गोवा संचार लेखा नियंत्रक (सीसीए) कार्यालयाच्या वतीने 26 नोव्हेंबर 2026 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये सामूहिक वाचन केले, तसेच संविधानात अंतर्भूत असलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांप्रति असलेल्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
उपस्थितांना संबोधित करताना महाराष्ट्र आणि गोवा संचार लेखा नियंत्रक डॉ. सतीश चंद्र झा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमूल्य योगदानावर, विशेषतः मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय संविधान घडवण्यातील त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. लोकशाही बळकट करण्यासाठी, सामाजिक न्याय सुनिश्चित करण्यासाठी आणि समतेला चालना देण्यासाठी संवैधानिक आदर्श आणि तत्त्वांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ही मूल्ये केवळ कार्यालयीन कर्तव्यांपुरती मर्यादित न राहता, प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन आचरणात आणि वैयक्तिक जीवनातही प्रतिबिंबित झाली पाहिजेत, असेही ते पुढे म्हणाले.
संविधानात अंतर्भूत असलेले आदर्श आणि मूल्ये जपण्याच्या, तसेच प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि समर्पणाने आपली कार्यालयीन कर्तव्ये पार पाडून लोकशाही मूल्ये व संवैधानिक नैतिकता बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा उपस्थितांनी पुनरुच्चार केला.
संचार लेखा सहनियंत्रक धम्मपाल खंडागळे यांच्या आभार प्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.



पीआयबी मुंबई | निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai