पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

‘व्हेनिस आर्ट बिएनाले’ मध्ये भारताच्या पॅव्हेलियनला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पॅव्हेलियनचा प्रतिष्ठेचा ‘व्हिजिटर्स लायन’ पुरस्कार; पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

Posted On: 25 NOV 2026 10:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026

व्हेनिस आर्ट बिएनाले या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात भारताच्या पॅव्हेलियनला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पॅव्हेलियनचा प्रतिष्ठेचा ‘व्हिजिटर्स लायन’ पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. भारताच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर केलेल्या टिप्पणीमध्ये म्हटले आहे :

“भारताच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे!

‘व्हेनिस आर्ट बिएनाले’ येथील भारताच्या पॅव्हेलियनला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पॅव्हेलियनचा प्रतिष्ठेचा ‘व्हिजिटर्स लायन’ पुरस्कार मिळाल्याचा मला आनंद आहे.

भारताचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा यापासून प्रेरणा घेत आपले कलाकार जागतिक कला क्षेत्रासमोर नवे दृष्टिकोन मांडत आहेत.

या यशामुळे अधिकाधिक तरुण भारतीयांना कलेच्या क्षेत्रात येण्याची आणि सर्जनशीलतेच्या नव्या क्षितिजांचा शोध घेण्याची प्रेरणा मिळो.”


सुवर्णा बेडेकर /आशुतोष सावे/प्रिती मालंडकर 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2341677) अभ्यागत कक्ष : 3