आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एम्स नागपूरकडून स्वादुपिंडाच्या कर्करोगावरील वैद्यकीय परिषद घेण्यात आली, 150 हून अधिक डॉक्टरांचा सहभाग

Posted On: 25 NOV 2026 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर 2026

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था - एम्स, नागपूरच्या शल्यचिकित्सा गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाने, नागपूर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सर्जन्स फोरम आणि असोसिएशन ऑफ सर्जन्स, यांच्या सहकार्याने 14 नोव्हेंबर 2026 रोजी एम्स नागपूर येथे पॅन-सीएमई 2026 या वैद्यकीय परिषदेचे आयोजन केले होते. स्वादुपिंडाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी पाळल्या जाणाऱ्या महिन्याच्या निमित्ताने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेची संकल्पना स्वादुपिंडाच्या गाठींचे निदान आणि उपचार यांसाठी व्यावहारिक दृष्टिकोन अशी होती.

या वैद्यकीय परिषदेत 150 हून अधिक डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी सहभाग घेतला. चंदीगड येथील पीजीआयएमईआर, मुंबईतील टाटा मेमोरियल रुग्णालय, नवी दिल्ली, जोधपूर आणि ऋषिकेश येथील एम्स, तसेच हैदराबाद येथील निजाम्स इन्स्टिट्यूट यांसह देशातील विविध नामांकित वैद्यकीय संस्थांमधील तज्ज्ञ डॉक्टर या परिषदेला उपस्थित होते. याशिवाय नागपूर आणि आसपासच्या परिसरातील ज्येष्ठ शल्यचिकित्सक, कर्करोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ, पचनसंस्थेचे विकार तज्ज्ञ डॉक्टर, क्ष-किरण तपासणी तज्ज्ञ आणि वैद्यकीय प्रशिक्षणार्थी यांनीही या परिषदेत सहभाग घेतला.

या वैद्यकीय परिषदेचे उद्घाटन एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक प्रा. प्रशांत पी. जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी स्वादुपिंडाचा कर्करोग हा पोटाच्या भागातील एक महत्त्वाचा आणि उपचारांच्या दृष्टीने आव्हानात्मक कर्करोग असल्याचे सांगितले. या आजाराचे लवकर निदान, वेळेवर शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेपूर्वी श गुप्ता, डॉ. चेतन कंठारिया, डॉ. मनोज व्याव्हारे, डॉ. राजेश पनवार, डॉ. कलायरासन राजा, डॉ. विक्रम ए. चौधरी, डॉ. वैभव वर्मा आणि डॉ. कमल बंधाटे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

तसेच शस्त्रक्रियेनंतर आवश्यकतेनुसार केल्या जाणाऱ्या केमोथेरपीचा योग्य वापर यावर त्यांनी भर दिला. या परिषदेत डॉ. पुनीत धर, डॉ. उदित चौहान, डॉ. राजे परिषदेचे आयोजन अध्यक्ष आणि एम्स नागपूरच्या शल्यचिकित्सा गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे प्रभारी डॉ. निर्झर राज राकेश यांनी विभागाच्या आजवरच्या वाटचालीची माहिती सादर केली. परिषदेच्या मुख्य आयोजन समितीमध्ये डॉ. निर्झर राज राकेश, डॉ. मोहनसुंदरम ए., डॉ. मनप्रीत उप्पल, डॉ. प्रचिती गोखे, डॉ. मकरंद,  विशाल छत्रशाल आणि अश्विन भैसारे यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला जीआयएस फोरमचे डॉ. सुधीर मधुकर टोमे, डॉ. योगेश बंग, डॉ. आयुष आणि डॉ. राजविलास, तसेच असोसिएशन ऑफ सर्जन्स, नागपूरचे डॉ. प्रवीण वैरागडे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. पॅन-सीएमई 2026  यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी देशभरातून आलेले तज्ज्ञ डॉक्टर, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ, सत्रांचे अध्यक्ष, चर्चासत्रांतील सहभागी, प्रतिनिधी, निवासी डॉक्टर आणि सहायक कर्मचाऱ्यांचे आभार मानले.


शैलेश पाटील/राज दळेकर/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2341651) अभ्यागत कक्ष : 6
Read this releasein: English