Posted On:
25 NOV 2026 6:43PM by PIB Mumbai
मुंबई, 25 नोव्हेंबर 2026
केंद्र सरकारच्या सांस्कृती मंत्रालयांतर्गत 'राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचा' (एनसीएसएम) भाग असलेले मुंबईतील 'नेहरू विज्ञान केंद्र', 27 नोव्हेंबर 2026 रोजी 'पश्चिम विभागीय राष्ट्रीय विज्ञान नाट्य स्पर्धा 2026–27 आयोजित करणार आहे. या स्पर्धेत सहा राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील प्रतिभावान विद्यार्थी संघ एकत्र येतील. ते वैज्ञानिक कल्पना आणि त्यांचा समाजाशी असलेला संबंध याचा मागोवा घेण्यासाठी थिएटर (नाट्य) चा सर्जनशील माध्यम म्हणून प्रयोग करतील.
“विज्ञान आणि समाज” या संकल्पनेवर आधारित असलेली ही स्पर्धा, नाट्य सादरीकरणांच्या माध्यमातून विज्ञानाला रंजक, सुलभ आणि विचारप्रवर्तक बनवण्याचे उद्दिष्ट ठेवते. राज्यस्तरीय स्पर्धांमधून निवड झालेले सहभागी संघ छत्तीसगड, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतील.
विद्यार्थी संघ समकालीन विषयांवर, विज्ञानावर आधारित नाटके हिंदी भाषेत सादर करतील. एआय (AI): मित्र, साधन की धोका? ईव्ही (EV) – भविष्यातील वाटचाल, आंतरतारकीय अधिवास, आणि महासागरांचे पुनरुज्जीवन – भावी पिढ्यांचे जतन, या विषयांचा यात समावेश आहे.
ही स्पर्धा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT), छत्तीसगड, SCERT, गोवा, राज्य शिक्षा केंद्र, मध्य प्रदेश, प्रादेशिक शैक्षणिक प्राधिकरण, SISE, महाराष्ट्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, राजस्थान, आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव.यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.
उद्घाटन समारंभ सकाळी 9:30 वाजता आयोजित करण्यात आला असून, मुंबईतील प्रसिद्ध नाट्यकर्मी, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि मिमिक्री कलाकार राजेंद्र बुटाला हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सायंकाळी 6:30 वाजता समारोप समारंभ आणि पारितोषिक वितरण सोहळ्याने या कार्यक्रमाची सांगता होईल. यावेळी मुंबई येथील प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि संपादक, अरुणा राजे पाटील यांची विशेष उपस्थिती असेल.
अपर्णा धर्माधिकारी, निलय वैद्य आणि सातपुते यांचा समावेश असलेली परीक्षक समिती, वैज्ञानिक आशय, पटकथा, सर्जनशीलता, अभिनय, सादरीकरण आणि एकूण प्रभाव या निकषांच्या आधारे सादरीकरणांचे मूल्यमापन करेल.
सुवर्णा बेडेकर /राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai