संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूर येथील राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमीमध्ये व्दितीय पदवीदान समारंभ

Posted On: 25 NOV 2026 6:34PM by PIB Mumbai

नागपूर, 25 नोव्हेंबर 2026

भारताच्या संरक्षण आणि उत्पादन या क्षेत्रांमधील भविष्यासाठी सज्ज नेतृत्व घडवण्याच्या मोहिमेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडत, नागपूर येथील राष्ट्रीय संरक्षण उत्पादन अकादमीने, उत्सव सभागृहात पीजीडीएम (व्यापार व्यवस्थापन) अभ्यासक्रमातील वर्ष 2024-25 च्या तुकडीचा दुसरा पदवीदान सोहोळा साजरा केला.

या सोहोळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून म्युनिशन्स इंडिया लिमिटेड या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय हजारी उपस्थित होते. पदवीदान समारंभात केलेल्या प्रेरणादायक भाषणात पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना भारताच्या धोरणात्मक भविष्याचे मार्गदर्शक संबोधत हजारी यांनी त्यांना नवोन्मेष, प्रामाणिकपणा तसेच व्यावसायिक उत्कृष्टतेच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करण्याच्या दिशेने अर्थपूर्ण योगदान देण्याचे आवाहन केले.

या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्यपूर्ण शक्तिस्थाने अधोरेखित करत संजय हजारी यांनी एनएडीपी या संस्थेच्या आयआयएम इंदूर या संस्थेचे मार्गदर्शन लाभलेल्या आणि हार्वर्ड बिझनेस पब्लिशिंग या संस्थेतील अध्ययन संसाधनांनी समृध्द झालेल्या पीजीडीएम (बीएम) अभ्यासक्रमाची प्रशंसा केली. संरक्षण क्षेत्रातील भविष्यासाठी सज्ज व्यवस्थापन शिक्षणाचा उत्कृष्ट नमुना अशा शब्दांत या अभ्यासक्रमाचे वर्णन करत अकादमीने नेतृत्व विकास, भावनिक  गुप्तचर, शाश्वतता आणि उद्योगाभिमुख शिक्षण यांच्यावर अधिक भर दिल्याचे त्यांनी सांगितले.

एकूण 27 विद्यार्थ्यांच्या या तुकडीसह, संरक्षण आणि व्यापार व्यवस्थापनावर अधिक भर असलेला, एआयसीटीई—मान्यताप्राप्त, दोन वर्षांचा पीजीडीएम (बीएम) हा निवासी अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केलेल्या पदवीधर विद्यार्थ्याचा या पदवीदान समारंभात गौरव करण्यात आला.

वरणगाव येथील आयुध कारखान्याचे अतिरिक्त महाव्यवस्थापक आणि एमआयएलचे पुरस्कृत उमेदवार असलेल्या भुवनेश वर्मा यांना प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले तर, ऋषिकेश एस.पायघन यांना रौप्य पदकाने गौरवण्यात आले. त्यांची असामान्य शैक्षणिक कामगिरी आणि नेतृत्व गुणांबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे.

या अभ्यासक्रमाने प्रभावी परिणाम साध्य करत 100% विद्यार्थ्यांना अंतर्वासिता संधी आणि 76% विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यात यश मिळवून दिले.


सुवर्णा बेडेकर/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2341470) अभ्यागत कक्ष : 8
Read this releasein: English